घरमुंबईइमारतीच्या अठराव्या मजल्यावरुन मुलीची आत्महत्या

इमारतीच्या अठराव्या मजल्यावरुन मुलीची आत्महत्या

Subscribe

आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट, एकाच इमारतीमधील आत्महत्येची दुसरी घटना

जोगेश्वरीत ‘ओबेरॉय स्पेल्डर’ इमारतीमधील १८ व्या मजल्यावरुन मोलकरणीने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ज्योती हरिशचंद्र पाटेकर (१९) असे या मुलीचे नाव असून ही याच इमारतीत काम करत होती. आय. सी. आय. सी. आय बँक अधिकारी नितिन सेवाराम खन्ना यांच्या फ्लॅटमध्ये मोलकरीण म्हणून कामाला होती. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या बाबत अधिक तपास करत आहेत. या इमारतीमधून आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एका महिलेने या बिल्डिंगमधून उडी घेत आत्महत्या केली होती. या घटनामुळे इमारतीमध्ये शांततेचे वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्री घडली. ज्योती ही गरीब असून मागील काही महिन्यांपासून ती मोलकरणी म्हणून या इमारतीत काम करत होती. रात्रीच्या सुमारास या मुलीने १८ व्या मजल्यावरुन उडी मारली. मुलीने आत्महत्या केल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली होती. इमारतीतील लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन यामुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदना नंतर पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -