घरमुंबईAaditya Thackeray : नशीब 'थीम पार्क'चा भाग म्हणून... आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर...

Aaditya Thackeray : नशीब ‘थीम पार्क’चा भाग म्हणून… आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा

Subscribe

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सवर उभारण्यात येणाऱ्या थीम पार्कवरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप पुरस्कृत राजवटीने रेसकोर्सची जागा हडपल्यासंदर्भात अजूनही काही प्रश्न अनुत्तरित असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – BJP : आदिवासींबद्दल कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, भाजपाची राहुल गांधींवर टीका

- Advertisement -

राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी महालक्ष्मी रेसकोर्सचा मुद्दा लावून धरला आहे. शिंदे सरकारच्या सर्व पॉलिसी या सुटाबूटातील लोकांसाठी आहे. त्याशिवाय रेसकोर्सच्या जागेवर आता थीम पार्क नाही तर सेंट्रल पार्क बनविण्याचा जो काही घाट घालण्यात येत आहे, तो मुख्यमंत्री शिदे यांच्या बिल्डर मित्रासाठी आहे, त्यामुळे या जागी अंडरग्राऊंड कारपार्किंग करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्याला आमचा कायम विरोध असेल, ही भूमिका आदित्य ठाकरे यांनी गेल्या महिन्यातच स्पष्ट केली होती.

- Advertisement -

त्यानंतर आज, मंगळवारी पुन्हा एकदा ट्वीट करत याच मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे –

  • रेसकोर्सच्या एका कोपऱ्यात असलेल्या छोट्या झोपड्या / घरांतील कुटुंबांचे पुनर्वसन कसे होणार, याबाबत स्पष्टता नाही. माझ्या माहितीनुसार, हे मिंधे सरकार आपल्या लाडक्या बिल्डरमार्फत रेसकोर्सवर ‘झोपू’ योजना राबवेल.
  • खासगी तबेल्यांच्या पुनर्बांधणीसाठी मुंबईकरांचे 100 कोटी का घालवायचे? या घोड्यांचे मालक आणि रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब हे त्यासाठी लागणारा पैसा मोजायला समर्थ आहेत.
  • आम्ही आधीच कोस्टल रोड येथे भूमिगत कार पार्किंगची व्यवस्था केली असताना आता रेसकोर्स येथे भूमिगत कार पार्किंग उभारण्याची गरजच काय? हे केवळ सीएम (कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांच्या) ठेकेदार मित्राला काम देण्यासाठी केले जात आहे. परिणामी, चार वर्षे खोदकाम सुरू राहील, रेसकोर्स बंद राहील आणि मुंबईचे वायूप्रदूषण वाढेल.

हे वाचा – Bonds of friendship : गळून पडल्या सीमा… भारत-पाकमधील मित्रांची 41 वर्षांनी झाली गळाभेट

  • सर्वात हास्यास्पद म्हणजे, हे भाजपा पुरस्कृत सरकार आम्ही कोस्टल रोड प्रकल्पासाठी राखून ठेवलेला 96 हेक्टरचा हरित पट्टाही याला जोडून असल्याचे दाखवत आहे. नशीब त्यांनी ‘अरबी समुद्र’ त्यांच्या ‘थीम पार्क’चा भाग म्हणून दाखवला नाही.
  • महालक्ष्मी रेसकोर्सनंतर बेकायदा मुख्यमंत्र्यांचा बिल्डर मित्र वेलिंग्टन क्लब, सीसीआय आणि आणखी मोकळ्या जागाही हडप करतील.

आमचे सरकार लवकरच सत्तेत येईल आणि ही लूट थांबवेल, याची मला खात्री आहे, असा आशावादही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Rahul Shewale : मुंबईतील ब्रिटिशकालीन 7 रेल्वे स्थानकांचे नामांतर; राहुल शेवाळे यांची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -