घरमुंबई'आपलं महानगर'चे संजय महाडीक यांना सत्त्याग्रही पत्रकार पुरस्कार

‘आपलं महानगर’चे संजय महाडीक यांना सत्त्याग्रही पत्रकार पुरस्कार

Subscribe

'आपलं महानगर'चे संजय महाडीक यांना यंदाचा सत्त्याग्रही पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

भारतरत्न डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या जागृतीसाठी चालवलेल्या मूकनायक या पाक्षिकाची शताब्दी येत्या ३१ जानेवारी पासून महाराष्ट्रासह देशभरात साजरी होत आहे. त्यानिमित्त १४ पत्रकारांना सत्याग्रही पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. खारघर येथील सत्त्याग्रह कॉलेजचे संस्थापक प्राचार्य प्रा डॉ जी के डोंगरगावकर यांनी हे पुरस्कार जाहीर केले असून ‘आपलं महानगर’चे संजय महाडीक यांना यंदाचा सत्त्याग्रही पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सत्त्याग्रही पत्रकार जाहीर

- Advertisement -

सत्त्याग्रही पत्रकार पुरस्कारासाठी निवड झालेल्या ज्येष्ठ पत्रकारांमध्ये राही भिडे (संपादक पुण्यनगरी), विवेक गिरधारी (कार्यकारी संपादक पुढारी), दिवाकर शेजवळ (माजी वृत्त संपादक सामना), प्रमोद चुंचूवार (राजकीय संपादक फ्री प्रेस जर्नल), प्रणव प्रियदर्शी (सह संपादक नवभारत टाईम्स, नवी दिल्ली) आणि बी. व्ही. जोंधळे (स्तंभलेखक) यांचा समावेश आहे. वृत्तपत्राचा डोलारा समर्थपणे पेलण्याची आणि तळागाळातील लोकांना व्यासपीठ मिळवून देण्याची कामगिरी केल्याबद्दल संचालक – संपादकांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यात विजय दर्डा (लोकमत), बबन कांबळे (सम्राट), आपलं महानगरचे पत्रकार तथा कोकण दर्पणचे संस्थापक संजय महाडिक, रा. सो. नलावडे (आम्रपाली) यांची नावे डॉ. डोंगरगावकर यांनी जाहीर केली आहेत. तर, वार्तांकनाची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बी. बी. नायक (टाइम्स ऑफ इंडिया) आणि जयवन्त बामणे (पुण्यनगरी) भीमराव गवळी (महाराष्ट्र टाईम्स), गजानन चव्हाण (सकाळ) यांनाही सत्याग्रही पत्रकार पुरस्कार देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, मानचिन्ह, संविधान, शाल असे राहील. तसेच मानकर्‍यांना हे पुरस्कार १० फेब्रुवारी रोजी सी.बी.डी बेलापूर येथे सिडको अर्बन हट सभागृहात शानदार समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत.


हेही वाचा – फुकट्यांमुळे मध्य रेल्वेच्या एसी लोकलचा फज्जा!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -