घरमुंबईफुकट्यांमुळे मध्य रेल्वेच्या एसी लोकलचा फज्जा!

फुकट्यांमुळे मध्य रेल्वेच्या एसी लोकलचा फज्जा!

Subscribe

मध्य रेल्वेची पहिली एसी लोकलची ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर मोठ्या थाटामाट सुरू झाली आहे. मात्र या एसी लोकलमधून बिनदिक्कत प्रवास करणार्‍या फुकट्या प्रवाशांनी या लोकलचा पार फज्जा उडवला आहे. मध्य रेल्वेच्या एसी लोकलने आतापर्यत कमाईचा 10 हजार रुपयांचा आकडासुध्दा पार केलेला नाही. पश्चिम रेल्वेची पहिली एसी लोकल 25 डिसेबर 2017 ला धावली. तेव्हा पहिल्याच दिवसात 68 हजार 16 रुपयांची कमाई केली होती. त्यातुलनेत मध्य रेल्वेची एसी लोकल अपयशी ठरली आहे.

प्रतिक्षेत असलेल्या मध्य रेल्वेची अत्याधुनिक एसी लोकल अखेर 30 जानेवारी 2020 पासून सुरु झाली आहे. ही मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गवरील ठाणे ते पनवेल या मार्गांवर धावत आहे. ही एसी लोकल सुरु होण्याअगोदर मध्य रेल्वेने प्रवासी संघटनांशी चर्चांं केली होती. मात्र या चर्चेत प्रवासी संघटनांचे मत ऐकून घेतले नाही. इतकेच नव्हेतर एसी लोकल सुरु करण्यापुर्वी ठाणे-पनवेल या मार्गांवरील परिसराचा अभ्याससुध्दा रेल्वेने केलेला नाही. मोठ्या घाईगडबडीत आणि रेल्वे मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन एसी लोकल सुरु केली.

- Advertisement -

ठाणे- वाशी या ट्रान्सहार्बर मार्गावर साध्या लोकलचा दिवसाला 262 फेर्‍या असतात. मात्र 31 जानेवारी पासून साध्या लोकलच्या 16 फेर्‍या रद्द करुन, त्याऐवजी एसी लोकलचा दिवसभरात 16 फेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागत आहे. प्रवाशांना एसी लोकलचे भाडे परवडत नसल्यामुळे एसी लोकल ऐवजी सेमी लोकल सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मध्य रेल्वे चिंतेत वाढ
मध्य रेल्वेला अपेक्षा होती कि, ट्रान्स हार्बरवर एसी लोकल चांगला प्रतिसाद मिळणार,मात्र वाढते फुकट्यामुळे एसी लोकचा पुर्णपणे बोजवार उडवला आहे.गेल्या तीन दिवसात मध्य रेल्वेला 10 हजार रुपायांचे महसूल गोळा करता आले नाही. पश्चिम रेल्वेची एसी लोकल सुरु होऊन अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पश्चिम रेल्वेची पहिली एसी लोकल 25 डिसेबर 2017 ला धावली. पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलने पहिल्याच दिवसात 68 हजार 16 रुपयांची कमाई केली होती. त्यातुलनेत मध्य रेल्वेला पहिल्या दिवशी 10 हजार रूपयांचा पल्ला गाठता आला नाही. दैनिक आपलं महानगरने पहिल्या एसी लोकलच्या प्रवाशांची आकडेवारी मागितली असता मध्य रेल्वेनी ती उपल्बध करुन दिली नाही. त्यानंतर मध्य रेल्वेचे वाणिज्य विभागाचे अधिकारी संपर्क केला असता त्यांनीही यावर उत्तर दिले नाही.

- Advertisement -

फुकट्यांमुळे रेल्वेचा खर्च वाढला
मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधून पहिल्या दिवसापासून फुकट्या प्रवाशांनी प्रवास करणे सुरु केले आहे. साध्या लोकलची संख्या कमी झाल्यामुळे प्रवासी चक्क एसी लोकलने प्रवास करु लागले होते. त्यामुळे एसी लोकलचे दार बंद होण्याससुध्दा अडचणी येत होत्या. फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वेने एसी लोकलच्या 12 डब्यात 6 टिसींची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात फुकट्यांवर आळा बसला असला तरी एसी लोकलचा खर्च निघणे कठिण झाले आहे.

एसी लोकल चालवत असताना,साध्या लोकल फेर्‍या कमी न करण्याची मागणी केली होती. मात्र रेल्वेने साध्या लोकल कमी करुन त्याऐवजी एसी लोकल सुरु केली आहे. त्यामुळे प्रवासी गर्दीचावेळी एसी लोकलमध्ये चढतात. रेल्वेनी एसी लोकल सुरु करताना कसलाही अभ्यास केला नाही. त्यामुळे आज रेल्वेला आणि रेल्वे प्रवाशांना त्याच्या फटका बसत आहे.
-सुभाष गुप्ता,रेल यात्री परिषद.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -