घरताज्या घडामोडीBMC Budget 2020 : उद्यान विभागासाठी २५४ कोटींची तरतूद

BMC Budget 2020 : उद्यान विभागासाठी २५४ कोटींची तरतूद

Subscribe

मुंबई महापालिकेने आगामी अर्थसंकल्पात उद्यान विभागासाठी २५४. १८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये मियावकी पद्धतीने मैदानांचा विकास करण्यावर भर दिला आहे.

मुंबई महापालिकेने आगामी अर्थसंकल्पात उद्यान विभागासाठी २५४. १८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये मियावकी पद्धतीने मैदानांचा विकास करण्यावर भर दिला आहे. स्थानिक प्रजातींचे दाट नागरी वने या तंत्रामार्फत मोकळ्या जागा, उद्याने आणि विकासकांच्या खासगी ले आउटमधील मनोरंजन मैदान यावर वृक्षारोपण केले जाईल. यासाठी महापालिकेने मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण तथा वनीकरण करून नागरी वन करण्यात येईल, असे आयुक्तांनी जाहीर केले आहे. वांद्रे तलावासह अंधेरी वि.रा.देसाई मार्ग आणि दहिसर पश्चिम येथील खुले क्रिडा संकुलांचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच याचे लोकार्पण करून जनतेसाठी खुले केले जाईल.

अग्निशमन दलासाठी १०५ कोटींची तरतूद

- Advertisement -

मुंबई अग्निशमन दलासाठी यंदा १०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून भविष्यात कांदिवली पूर्व येथे ठाकूर व्हिलेज, कांजूरमार्ग पश्चिम येथील एल.बी.एस मार्ग, सांताक्रुझ पश्चिम येथील जुहू तारा रोड आदी ठिकाणी लवकरच सर्व सोयीसुविधा युक्त सुसज्ज, असे अग्निशमन दलाचे केंद्र बांधण्यात येणार आहे. तसेच कांदिवली ठाकूर व्हिलेज अग्निशमन केंद्रात अद्ययावत ड्रील टॉवर कम मल्टी युटिलिटी ट्रेनिंग सिम्युलेटर्सची बांधणी करण्यात येणार आहे.


हेही वाचा – BMC Budget 2020: सात मल जल केंद्रांसाठी सुधारीत निविदा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -