घरमुंबईआरोप केलेला मनुष्य आपल्या पक्षात येतो...; रवींद्र वायकरांनी सोमय्यांवर केला पलटवार

आरोप केलेला मनुष्य आपल्या पक्षात येतो…; रवींद्र वायकरांनी सोमय्यांवर केला पलटवार

Subscribe

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी मुंबई महापालिकेची (BMC) दोन लाख वर्ग फूट जमिनीवर अनधिकृत कब्जा केला असून तिथे 500 कोटींचं पंचतारांकित हॉटेल उभारलं जात असल्याचा आरोप भाजपा नेते (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. यानंतर रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच तास चौकशी करण्यात आली आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना रवींद्र वायकर यांनी किरीट सोमय्यावर पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले की, आरोप केलेला मनुष्य आपल्या पक्षात येतो, हे उद्दिष्ट साध्य झालं की, तो मनुष्य निर्मा पावडरमध्ये धुतल्यासारखा चांगला होतो. (Accused man comes to his side Ravindra Vaikar counterattacked the Somayyas)

हेही वाचा – Nana Patole : मुंबईत होणाऱ्या ‘INDIA’च्या बैठकीला वेगळं महत्त्व; कारण…

- Advertisement -

रवींद्र वायकर म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी 500 कोटींच्या भ्रष्टाचाराची तक्रार केली आहे, जी तथ्यहीन आहे. मला गुन्हे शाखेने मागे बोलावलं होतं. पण अधिवेशन सुरू होतं आणि त्या काळात माझी आई वारली, त्यामुळे मी वेळ मागून घेतली होती. त्यानुसार मी आज आलो आहे. किरीट सोमय्या किती खोटं बोलतात याबाबत मी त्यांना सांगितलं आहे. माझं जे काही विधान होतं, ते मी गुन्हे शाखेला दिलेलं आहे. किरीट सोमय्यांनी केलेले आरोप किती खोटे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मी विधानसभेतही बोललो आहे. तसे पुरावेही दिलेले आहेत, असे रवींद्र वायकर म्हणाले.

मी बाळासाहेबांचा एकनिष्ठ शिवसैनिक

एखादा माणूस खोटा आणि विकृत असेल, जो जाणून बुजून एका लोकप्रतिनिधीवर आरोप करत असेल आणि हा मनुष्य आपल्या पक्षात येतो आहे, हे त्याचं उद्दिष्ट साध्य झालं की, आरोप करण्यात आलेला मनुष्य निर्मा पावडरमध्ये धुतल्यासारखा चांगला होतो. अशी किरीट सोमय्याची पद्धत आहे. परंतु मी बाळासाहेबांचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि उद्धव ठाकरेंवर माझी निष्यम भक्ती आहे. चांगल्या माणसांना संतावने हा त्यांचा हेतू आहे. त्यामुळे ते मला जेवढा जास्त देता येईल तेवढा देत आहेत. परंतु मी सर्व गोष्टी कायद्याच्या कक्षेत राहून केल्या आहेत, गैर केलेल्या नाहीत. याबद्दल मी अधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे, असे रवींद्र वायकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – NIA Raid : भिवंडीत एनआयएची छापेमारी; दहशतवाद्यांच्या कॅशिअरला घेतलं ताब्यात

माझी बाजू सत्याची असल्याने मी न्यायालयात

मुंबई महानगरपालिकेच्या 1991 जीआरनुसार बांधकाम केलेलं आहे. फक्त माझाचं क्लब नाही तर अनेक क्लब तशापद्धतीने बनवण्यात आले आहेत. त्याठिकाणीसुद्धा लग्न कार्य होतात. तसेच नवीन नियमावलीला मुंबई मनपा आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे. त्या नियमानुसार मी काम केलं आहे. आयएएस अधिकारी बदलले आहेत. परंतु माझी बाजू सत्याची असल्याने मी न्यायालयात गेलो आहे, असेही वायकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -