घरताज्या घडामोडीधक्कादायक! सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आईनेही दिली साथ

धक्कादायक! सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आईनेही दिली साथ

Subscribe

एका सावत्र बापाने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना विरार येथे घडली आहे.

आपल्या १३ वर्षीय मुलीवर गेल्या तीन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करणार्‍या सावत्र पित्याविरोधात विरार पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात नवर्‍याला साथ देणार्‍या आईवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा उघडकीस आला प्रकार

विरार पूर्वेकडे पीडित आपली आई, लहान बहिण आणि सावत्र वडिलांसोबत राहत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सावत्र वडिल दररोज रात्री पीडितीवर लैंगिक अत्याचार करीत होता. याबाबत कुणाला सांगितले तर बहिणीसह तुलाही ठार मारीन, अशी धमकीही तो वारंवार त्या अल्पवयीन मुलीला देत असे. त्यामुळे घाबरलेल्या पीडीत मुलीने ही बाब कोणालाच सांगितली नाही. मात्र, वारंवार होणाऱ्या कृत्याबाबात पीडितीने आईच्या कानावर हीबाब घातली. पण, आईने विरोध न करता नवर्‍यालाच साथ दिली. त्यामुळे नेहमी होत असलेल्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने विरार पोलीस ठाणे गाठत पोलिसांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी पीडितीचा सावत्र बाप आणि सख्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोदी-शहांना जे हवं होतं तेच घडत आहे – शिवसेना


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -