घरमुंबईमुंबईच्या उद्यानाचा विकास करणार कृषी उत्पादन कंपनी

मुंबईच्या उद्यानाचा विकास करणार कृषी उत्पादन कंपनी

Subscribe

शिल्पाकृती, जॉगिंग ट्रक, व्यायाम शाळा उभारणार

मुंबईतील जोगेश्वरी येथे उभारण्यात आलेल्या शिल्पाकृती उद्यानानंतर याच पध्दतीचे उद्यान खार-सांताक्रुझ पश्चिम बाजुस उभारले जाणार आहे. एच/पश्चिम विभागातील खार-सांताक्रुझ येथील एस.व्ही. मार्ग व गुरुनानक मार्ग जंक्शन येथील साधु वासवानी येथील बकाल झालेल्या उद्यानांचे सुशोभिकरण करून त्यात शिल्पाकृती उभारल्या जाणार आहेत. शिवाय भिंतीवरील म्युरलही बनवले जाणार आहे. जॉगिंग ट्रॅक, व्यायाम शाळा उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या कामासाठी अ‍ॅग्रो प्रॉडक्ट कंपनीची निवड करण्यात आली आहे. याप्रकारच्या कामाचा अशा कंपनीला किती अनुभव आहे, याबाबतची माहिती मात्र महापालिकेने गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे या कामाचे टेंडर अशा कंपनीला देण्यामागे कुणाचे लागेबंध आहेत, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

साधु वासवानी येथील उद्यानाच्या सुशोभिकरणात जॉगिंग ट्रॅक, पदपथ, प्रवेशद्वार, गझिबो, शिल्पाकृती तसेच हिरवळ आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी रावेची अ‍ॅग्रो प्रॉडक्ट कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीने महापालिकेच्या अंदाजित रकमेपेक्षा २५ टक्के कमी बोली लावत १ कोटी ८५ लाख रुपयांना हे काम मिळवले आहे. या कंपनीने यापूर्वी कुठे कामे केली आहेत किंवा नाहीत याची कोणतीही माहिती महापालिकेने दिलेली नाही. महापालिका ही सोन्याचे अंडे देणारी असल्याने कोणत्याही प्रकारच्या कंपन्या स्थापून महापालिकेची कामे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या कंपनीच्या पुर्वानुभावाचा विचार करता या कंपनीच्या विकास कामांवर शंका उपस्थित होत आहे.

- Advertisement -

सांताक्रुझ पश्चिम येथील धर्मवीर संभाजी मैदानात क्रिकेट, कबड्डी व व्हॉलीबॉल आदी खेळांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी ५ कोटी १० लाख रुपय खर्च येणार आसून त्याकरता कनक कन्स्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. एफ/दक्षिण विभागातील काळाचौकी येथील खेळाचे मैदान, चंद्रशेखर जोशी उद्यान आणि हुतात्मा राजगुरु उद्यान आदींचा विकास करण्यात येणार असून यासाठी राठोड पॉटरीज अ‍ॅण्ड नर्सरी या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी १ कोटी ४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -