घरताज्या घडामोडीअद्यापही सेवा न देणाऱ्या दवाखान्यांवर करा कारवाई; आयुक्तांचे आदेश

अद्यापही सेवा न देणाऱ्या दवाखान्यांवर करा कारवाई; आयुक्तांचे आदेश

Subscribe

‘कोरोना कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खाजगी नर्सिंग होम आणि खाजगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश महापालिकेने देऊनही जर ते सुरु केले जात नसतील त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे नोंदविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विभागीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

‘कोरोना कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खाजगी नर्सिंग होम आणि खाजगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश महापालिकेने देऊनही जर ते सुरु केले जात नसतील त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे नोंदविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बुधवारी विभागीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर जी खाजगी रुग्णालये, नर्सिंग होम आणि दवाखाने सुरू होतील त्यांना महापालिकेच्यामाध्यमातून ‘ ई. किट’ देण्याचेही निर्देशही यावेळी महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

सहायक आयुक्तांना पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे २४ विभागीय सहायक आयुक्तांसोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी महापालिकेच्या निर्देशानंतर विभागात किती नर्सिंग होम्स, खासगी रुग्णालये तसेच खासगी दवाखाने सुरु झाले आहेत, याचा आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

यापूर्वी वारंवार सूचना देऊनही अनेक ठिकाणी अद्याप काही नर्सिंग होम, हॉस्पिटल आणि खाजगी दवाखाने बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जी खाजगी नर्सिंग होम, खाजगी रुग्णालये वा खाजगी दवाखाने अद्याप सुरू झालेले नसतील.

गेल्या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये महापालिका क्षेत्रातील जे खाजगी रुग्णालये, नर्सिंग होम, खाजगी दवाखाने बंद आढळून आले, त्यांना प्रथम सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. यानंतर याबाबत वारंवार सूचना आणि नोटीस देखील देण्यात आल्या होत्या. नोटीस देण्याच्या कार्यवाहीनंतर महापालिका क्षेत्रातील काही खाजगी नर्सिंग होम, खाजगी रुग्णालये आणि काही खाजगी दवाखाने सुरू झाली. यानुसार सुरू झालेल्या खाजगी रुग्णालयांना किंवा खाजगी दवाखान्यांना महापालिकेद्वारे ‘पी.पी.ई. किट’ देखील उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु, वारंवार सूचना आणि नोटीस देऊनही काही खाजगी रुग्णालय आणि खाजगी दवाखाने अद्यापही बंद असल्याचे आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

- Advertisement -

नागरिकांची गरज आणि परिस्थिती लक्षात न घेता बंद ठेवण्यात येत असलेल्या या खाजगी रुग्णालयांवर आणि खाजगी दवाखान्यांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बुधवारी महापालिका आयुक्तांनी विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील बंद असलेली खाजगी रुग्णालये, खाजगी नर्सिंग होम व खाजगी दवाखाने यांची यादी करण्याचे निर्देश देत त्यांच्याविरोधात पोलीस कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.


हेही वाचा – Corona: दिलासा! धारावीतील वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -