घरमहाराष्ट्रनाशिकवीरगावजवळ जीप-दुचाकी अपघात; तिघे गंभीर जखमी

वीरगावजवळ जीप-दुचाकी अपघात; तिघे गंभीर जखमी

Subscribe

सटाणा तालुक्यातील विरगावजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या तवेरा जीपने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीचालकसह दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. येथील खासगी रुग्णालयात दोन्ही महिलांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ त्यांना नाशिक येथे हलवण्यात आले आहे. दुचाकीचालकावर सटाणा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

समाधान महारु गायकवाड (25, रा. विंचुरे), कल्पना बाजीराव पवार (30, रा. सडक सौंदाणे) व नूतन कापडणीस (23, रा. द्याने) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर आव्हाटी येथील नितीन सोनवणे (सटाणकर) असे तवेराचालकाचे नाव आहे. समाधान गायकवाड हे बहीण कल्पना पवार व नातेवाईक नूतन कापडणीस यांसह दुचाकीने विंचुरे येथे जात होते. यासंदर्भात अद्याप सटाणा पोलीस ठाण्यात कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल झालेला नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -