घरCORONA UPDATECorona: दिलासा! धारावीतील वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर

Corona: दिलासा! धारावीतील वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर

Subscribe

मागील काही दिवसांपासून धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून दरदिवशी आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ पाहायला मिळत होती. मागील दिवसांपासून सरासरी ५० रुग्ण संख्या असलेल्या धारावीत मागील दोन दिवसांपासून रुग्ण संख्य कमी होताना दिसत आहे. दोन दिवसांमध्ये सरासरी २५ रुग्ण आढळून येत असून बुधवारी धारावीत केवळ २५ रुग्ण आढळून आल्याची आकडेवारी महापालिका प्रशासनाने दिली आहे. ही संख्या कमी झाली असली धारावीतील लोकांच्या मनातील भीती कायमच आहे.

धारावीत मंगळवारी २६ रुग्ण आढळून आले होते. तर बुधवारी दिवसभरात एकूण २५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे धरावीतील एकूण रुग्णांची  संख्या १ हजार ३७८ वर पोहोचली आहे. धारावीत पुन्हा एकदा दिवसभरात माटुंगा लेबर कॅम्पमध्ये सर्वाधिक ६ रुग्ण आढळले. तर सुरुवातीला रुग्ण मिळालेल्या डॉ. बलिगा नगरमध्ये पुन्हा ५४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. याशिवाय इंदिरानगर, ६० फुटी रस्ता, उत्तर भारतीय सोसायटी, कल्पतरु सोसायटी, गांधी नगर, ट्रान्झिट कॅम्प, आझाद नगर, रामसेतू चाळ, कमला नेहरु नगर, धारावी क्रॉस रोड आदी ठिकाणी दिवसभरात रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत संपूर्ण धारावीत ५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

माहिम पोलीस कॉलनीत ५ कोरोनाबाधित

माहिम येथील पोलीस कॉलनीत आतापर्यंत अनेक रुग्णांना कोरोनाची लागण झालेली असतानाच बुधवारी आणखी पाच रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र दिवसभरात माहिममध्ये कोरोनाचे एकूण १५ रुग्ण आढळून आले असून उर्वरीत रुग्ण हे माकावाती सोसायटी, टायकलवाडी, काद्रीवाडी, मोगल लेन, आनंदाश्रम, वर्षा बिल्डिंग, मोरी रोड, वॅलेगिनी टॉवर, ओमसाई अपार्टमेंट, सागर संध्या रहिवाशी संघ आदी ठिकाणी आढळले. त्यामुळे माहिममधील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४७ वर पोहोचली आहे.

दादरमध्ये आणखी ११ कोरोनाचे रुग्ण

दादरमध्ये कोरोनाचे आणखी ११ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यामुळे दादरमधील एकूण बाधित रुग्णांची संख्या १८७ वर पोहोचली आहे. दिवसभरात मारवाडी चाळ व गुरुप्रभा अपार्टमेंटमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण तर गोखले रोड इमारत, आनंदालया इमारत, भाये पार्क, कालिका दर्शन, स्वराज्य सोसायटी, रायचंद वाडी,  सुखशांती इमारत आदी ठिकाणीही रुग्ण आढळून आले.

- Advertisement -

हेही वाचा –

कोव्हिड वॉर्डात डॉक्टरच्या डोक्यावर पंखा पडला; नायरमधील घटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -