घरमुंबईजयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चार आरोपींना फाशीची शिक्षा

जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चार आरोपींना फाशीची शिक्षा

Subscribe

जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जयपूर विशेष कोर्टाने चार आरोपींना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी कोर्टाने एकाची निर्दोष म्हणून सूटका केली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना दिल्लीतील बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकीत ठार मारले गेले होते. दरम्यान, शिक्षा झालेल्या आरोपींचे नाव सरवर आझमी, मोहम्मद सैफ, सैफुर रहमान आणि सलमान असे आहे.

जयपूरमध्ये १३ मे २००८ रोजी आठ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणला गेला होता. यामध्ये ८० जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जयपूर विशेष कोर्टात खटला सुरु होता. याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली होती. यापैकी चार जणांना दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत कोर्टाने दोषी ठरवले तर एकाची मुक्तता केली. आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -