घरताज्या घडामोडीअंबानी, स्फोटक भरलेली स्कॉर्पियो, मनसुख, वाझे ते मुंब्रा खाडी---काय आहे प्रकरण?

अंबानी, स्फोटक भरलेली स्कॉर्पियो, मनसुख, वाझे ते मुंब्रा खाडी—काय आहे प्रकरण?

Subscribe

काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटक भरलेली स्कॉर्पियो कार सापडली होती. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यानंतर जैश उल हिंद या संघटनेने या कारची जबाबदारी घेतली. यामुळे अंबानीच नाही तर देशातील उद्योगपती हे जैशच्या निशाण्यावर असल्याची चर्चा सुरू झाली.

पण त्यानंतर स्फोटकांनी भरलेली कार हे फक्त एक ट्रेलर आहे. मोठे चित्र अजून समोर यायचे आहे अशी धमकीची चिठ्ठी या गाडीत सापडली. यात अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली. त्याचबरोबर जैश उल हिंदने बिटकॉईनच्या स्वरूपात पैसा मागत हिंमत असेल तर आम्हांला रोखून दाखवा असे आव्हान तपास यंत्रणांना करण्यात आले.

- Advertisement -

यादरम्यान, स्कॉर्पियो गाडीच्या मालकाचा शोध सुरू होता. त्यात स्कॉर्पियो कार ही ठाण्यात राहणारे ऑटोमोबाइल व्यावसायिक हिरेन मनसुख यांची असल्याचे समोर आले. ती गाडी विकण्याचा ते विचार करत होते. १७ फेब्रुवारीला मनसुख हीच गाडी घेऊन ऑपेरा हाऊसला येत होते. पण गाडी मध्येच बिघडली. यामुळे त्यांनी कार उड्डाणपुलाजवळ सोडली. व ते कॅबने पुढे गेले. पण रात्री परत आले तेव्हा कार तेथे नव्हती. यामुळे त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कारचोरीची तक्रार केली. पण जर गाडी बिघडली होती तर ती चोरट्यांनी नेलीच कशी असा प्रश्न उपस्थित झाला. त्याप्रकरणी गेले अनेक दिवस मनसुख यांची चौकशीही सुरू होती.

विशेष म्हणजे याकारमध्ये चार बनावट नंबर प्लेट्सही सापडल्या .ज्या अंबानीच्या कारच्या क्रमांकाशी मिळत्याजुळत्या होत्या. त्यानंतर आता त्या संशयित कारबरोबर एक पांढरी इनोव्हाही होती. असे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याने हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही हे स्पष्ट झाले होते. दरम्यान, कारचा मालक मनसुख हिरेन कालपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. यामुळे ह्याप्रकरणातील गूढ अधिक वाढले.

- Advertisement -

पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत काही मुद्दे उपस्थित करत ह्या संपू्र्ण प्रकरणात काळेबेरे असल्याचा आरोप केला. त्यात एकच गाडी तेथे नव्हती. तर दोन्ही गाड्या एकाच मार्गाने आल्या. त्याही ठाण्यातून. तसेच गाडीची ओळख झाल्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे तिथे सर्वात आधी कसे पोहचले? तसेच तीन दिवसांपूर्वीच सचिन वाझेंना का काढण्यात आले? ज्यांची गाडी चोरीला गेली त्यांच्याबरोबर वझे यांनी अनेकवेळा संपर्कही केला.असे अनेक प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. यावरून राजकारण तापले असतानाच काही वेळापूर्वी मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदरात सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -