घरमुंबईमराठी नामफलक लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ

मराठी नामफलक लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ

Subscribe

मुंबईतील दुकाने आणि आस्थापने यांच्या मारातही नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी वाढीव मुदत ही ३० सप्टेंबर पर्यंत देण्यात आली आहे.

दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक म्हणजेच पाट्या या मराठीत असाव्यात हा विषय गेले अनेक महिने सुरु आहे. याचसंदर्भांत आता आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक मराठीत लावण्यासाठी आता तीन महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. विविध व्यापारी संघटनांनी नामफलकात सुधारणा करण्यास वाढीव मुदत मिळावी यासाठी विनन्ती केली होती., असे मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल(dr. Iqbal Chahal) यांनी संगितले. त्यानुसारच आता नामफलकात सुधारणा करण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली आहे. नवीन वाढीव मुदत ३० सप्टेंबर पर्यंत देण्यात आली आहे. चौथ्यांदा देण्यात आलेली ही मुदतवाढ आहे.

हे ही वाचा –  माजी नगरसेविका शीतल म्हात्रेही शिंदे गटात सामील होणार?

- Advertisement -

मुंबईतील दुकाने आणि आस्थापने यांच्या मारातही नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी वाढीव मुदत ही ३० सप्टेंबर पर्यंत देण्यात आली आहे. मात्र आणखी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. त्यामुळेच महानगर मालिकेचे आयुक्त्य डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त (शहर) आशिष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध व्यापारी संघटना सहभागी झाल्या होत्या. या बैठकीत सहभागी झालेलया व्यापारी संघटनांनी नामफलकात सुधारणा करण्यासाठी मुदत वाढवून मिळावी यासाठी विंनती केली होती. त्यामुळे नामफलकांमध्ये सुधारणा करण्यासाठी तीन महिन्यांची वाढीव मुदत देण्यास मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिह चहल(dr. Iqbal Chahal) यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.

हे ही वाचा – पोक्सोचा माजी पोलीस आयुक्तांचा आदेश रद्द

- Advertisement -

पालिका(BMC) आयुक्तांनी मंजुरी दिली त्यानुसार नामफलकांमध्ये सुधारणा करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती दुकाने आणि आस्थापना खात्याच्या प्रमुख अधिकारी सुनीता जोशी यांनी दिली. मुंबईतील सर्व आस्थापनांना नामफलकात आवश्यक तो बादल करण्यासाठी पालिकेने याआधी ३१ मी २०२२ पर्यंत मुदत दिली होती. त्यांनतर हा कालावधी पुन्हा आठ – दहा दिवस वाढविण्यात आला होता. पण त्यानंतर ही मुदत व्यापारी संघटनांच्या मागणीमुळे ही मुदतवाढ ३० जून पर्यंत वाढविण्यात आली होती. आणि आता नवीन मुदत ३० सप्टेंबर २०२२ करण्यात आली आहे.

हे ही वाचा – महागाईचा भडका! सीएनजी चार तर पीएनजी तीन रुपयांनी महागला

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -