Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र गुरुपौर्णिमा : 'गुरूर' भी वो ही..., संजय राऊत यांचे बाळासाहेबांना अभिवादन

गुरुपौर्णिमा : ‘गुरूर’ भी वो ही…, संजय राऊत यांचे बाळासाहेबांना अभिवादन

Subscribe

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी ‘उठाव’ केल्यामुळे शिवसेनेते मोठी फूट पडली आहे. त्यातच शिंदे गटाच्या बहुतांश आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट करत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.

- Advertisement -

गेल्या 56 वर्षांत शिवसेनेला अनेकदा धक्के बसले आहेत. पण यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडाने शिवसेनेसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण सर्व एकत्र आल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. या आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याजवळ असलेल्या कोंडाळ्यावर आक्षेप घेतला आहे. त्यातही बहुतेकांची नाराजी संजय राऊत यांच्यावरच आहे आणि त्यांनी ती वेळोवेळी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होताच सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा

- Advertisement -

संजय राऊत हेच राष्ट्रवादीची सुपारी घेऊन संपूर्ण शिवसेना संपवायला निघाले होते, असा खळबजनक आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. आमदार गुलाबराव पाटील यांनी त्यांचा उल्लेख ‘नासकी भाजी’ असा केला आहे. तर आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांना ‘शिवसेनेचे नारदमुनी’ म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे सज्जन व्यक्ती आहेत. मात्र संजय राऊत यांनी शिवसेनेचे वाटोळं केल्याची टीका आमदार विजय शिवतारे यांनी केली आहे.

यासर्व पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संजय राऊत ट्विटरच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंप्रति निष्ठा व्यक्त केली आहे. बाळासाहेबांबरोबरचा फोटो शेअर करत, ‘वो ही ‘गुरू’… ‘गुरूर’ भी वो ही’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -