घरमुंबईविधी पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

विधी पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Subscribe

24 जुलैपर्यंत भरता येणार अर्ज

आरक्षणाच्या गोंधळामुळे रखडलेली विधी पाच वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 24 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

सीईटी सेलने घेतलेल्या पाच वर्षे अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 18 हजार 114 विद्यार्थ्यांनी दिली होती. या परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला होता. निकाल जाहीर होऊन दोन महिने झाले तरी प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने विद्यार्थी सीईटी सेलकडे विचारणा करत होते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने आर्थिकदृष्ठ्या सवर्ण विद्यार्थ्यांना 10 टक्के आरक्षण लागू केले, परंतु यंदापासून हे आरक्षण लागू करू नये असे बार काऊन्सिलचे म्हणणे होते, तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सीईटी सेलला हे आरक्षण लागू करण्यास सांगितले होते. आरक्षणाच्या या गोंधळामुळे प्रवेशाची प्रक्रिया रखडली होती. अखेर सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

- Advertisement -

वेळापत्रकानुसार अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण यादी 30 जुलैला 3 वाजता जाहीर होईल. याबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रारी असल्यास ते 31 ते 2 ऑगस्टपर्यंत वैयक्तीक लॉगिनमधून ऑनलाईन भरू शकतील. तर 13 ऑगस्टला प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीत प्रवेश मिळणार्‍या विद्यार्थ्यांना 14 ते 20 ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. तसेच या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 20 ऑगस्टला जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

बीए, बीएसस्सी, बी.एड प्रवेशाचेही वेळापत्रक जाहीर
बीए, बीएसस्सी, बी.एड चार वर्ष एकात्मिक पूर्ण वेळ अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 24 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -