घरक्रीडावर्ल्डकप विजेते ट्रेवर बेलिस सनरायजर्सच्या प्रशिक्षकपदी

वर्ल्डकप विजेते ट्रेवर बेलिस सनरायजर्सच्या प्रशिक्षकपदी

Subscribe

नुकताच झालेला क्रिकेट विश्वचषक जिंकणार्‍या यजमान इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघ सनरायजर्स हैदराबाद संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. पुढील महिन्यात सुरू होणार्‍या अ‍ॅशेस मालिकेनंतर ते इंग्लंडचे प्रशिक्षकपद सोडणार आहेत. सनरायजर्स हैदराबादला तब्बल सात वर्षांनी नवा प्रशिक्षक मिळणार आहे.

मागील सात वर्षे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी सनरायजर्सचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०१६ मध्ये सनरायजर्सने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. मात्र, मागील वर्षी या संघाला अंतिम फेरीही गाठण्यात अपयश आले. त्यामुळे आता सनरायजर्सने मूडी त्यांच्या जागी बेलिस यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

खूप विचार केल्यानंतर सनरायजर्स संघाने नवे प्रशिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टॉम मूडी यांच्या जागी ट्रेवर बेलिस यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. २०१९ विश्वचषक विजेत्या इंग्लंडचे प्रशिक्षक बेलिस यांनी याआधी कोलकाता नाईट रायडर्सला दोनवेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन संघ सिडनी सिक्सर्सने त्यांच्या मार्गदर्शनाखाली बिग बॅश आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे ते सनरायजर्सला योग्य दिशेने पुढे नेऊ शकतील असा आम्हाला विश्वास आहे, असे सनरायजर्स संघाने पत्रकात लिहिले. तसेच त्यांनी मूडी यांचे आभारही मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -