घरमुंबईAryan Khan Bail : रिलिजची वेळ ठरली! आर्यन खानची जामीनाची प्रत पहाटे...

Aryan Khan Bail : रिलिजची वेळ ठरली! आर्यन खानची जामीनाची प्रत पहाटे आर्थर रोड तुरुंगात जमा

Subscribe

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज जामीनावर तुरुंगाबाहेर येणार आहे. आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने आज पहाटे ५.३० वाजता जामीन आदेशाची पेटी उघडली होती. यातून जामीन आदेशाची प्रत एनडीपीएस न्यायालयातून आर्थर रोड कारागृहात पोहोचली आहे. त्यामुळे आर्यन खान ११ वाजेपर्यंत तुरुंगातून बाहेर येऊ शकतो. आर्यन खानला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. यानंतर शुक्रवारी सत्र न्यायालयाने जामीन पत्र भरण्यासाठीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. मात्र शनिवारी ही सर्व कागदपत्र आर्थर रोड तुरुंग प्रशासनाच्या जामीन पेटीत जमा करण्यास उशीर झाला. त्यामुळे आर्यन खानची सुटका शनिवारपर्यंत वाढण्यात आली.

मात्र काल उशीरा सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता झाल्याने आज आर्यन खानला ११ वाजता तुरुंगातून बाहेर सोडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी आर्यन खान आता तुरुंगाबाहेर पडेल. आर्यन खानशिवाय मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंड यांनाही आज जामीन मिळण्यासाठी अडचणी येत आहे. आर्यन खानला आणण्यासाठी शाहरुख खानच्या दोन गाड्या आर्थर रोड जेलच्या दिशेने रवाना झाल्या आहे.

- Advertisement -

शुक्रवारी आर्यन खानची सर्व कागदपत्रे न पोहचल्याने आर्थर रोड तुरुंगातून त्यांची  सुटका होऊ शकली नाही. जामीन दिल्याची कोर्टाची कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जेल प्रशासनाच्या पत्रपेटीत पोहोचणे अपेक्षित होते; पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे शुक्रवारी आर्यनची सुटका झाली नाही. आर्यनला शुक्रवारची रात्रदेखील जेलमध्येच काढावी लागली.

७ अटींवर आर्यनला मिळाला जामीन

१) आर्यन या प्रकरणातील अन्य कोणत्याही आरोपीशी संपर्क साधणार नाही.

- Advertisement -

२) पुराव्याशी छेडछाड करणार नाही.

३) आपला पासपोर्ट स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जमा करा.

४) प्रसारमाध्यमांमध्ये भाषणबाजी करणार नाही.

५) न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडणार नाही.

६) एनसीबीला गरज पडेल तेव्हा सहकार्य करेल.

७)यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द करण्यात येईल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -