घरताज्या घडामोडीNCBच्या चौकशीत सतत रडतोय Aryan, शाहरुख सोबत केवळ २ मिनिटं झालं बोलणं

NCBच्या चौकशीत सतत रडतोय Aryan, शाहरुख सोबत केवळ २ मिनिटं झालं बोलणं

Subscribe

गेल्या ४ वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करत असल्याचे कबूल केले

अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) एनसीबीने (NCB) ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर शाहरुख स्पेनमधील त्याचे पठाण (Pathan) सिनेमाचे शुटींग अर्धवट टाकून भारतात परतला. मुलाला ताब्यात घेतल्यापासून शाहरुख एनसीबीच्या संपर्कात असून तो वेळोवेळी मुलगा आर्यनची चौकशी करत आहे. आर्यनला रविवारी मुंबईत आणले गेले आणि त्याची एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आर्यनने मी ड्रग्जचे सेवन केल्याचे कबूल केल्यानंतर त्याला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली.

चौकशी दरम्यान आर्यन सतत रडत असल्याची माहिती समोर आली आहे. तो शाहरुखशी बोलण्यासाठी वाट पाहत असून केवळ २ मिनिटेच त्याचे शाहरुखशी बोलणे होऊ शकले आहे. एनसीबीकडून आर्यनची सतत चौकशी होत आहे. यादरम्यान त्याने मी गेल्या ४ वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करत असल्याचे कबूल केले. भारतात तसेच भारताबाहेर युके दुबई सारख्या देशातही आर्यनने ड्रग्जचे सेवन केल्याचे कबूल केले आहे.

- Advertisement -

आर्यन आणि अरबाज १५ वर्षांपासूनचे मित्र आहेत. गेल्या ४ वर्षांपासून आर्यन अनेक ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात होता आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज याला एनसीबीने एकमेकांसमोर बसवून त्यांच्याकडून जबाब नोंदवून घेतला. त्याचप्रमाणे आर्यनने मला ड्रग्ज पार्टीत गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते. माझ्या नावाखाली इतरांना आमंत्रण देण्यात आल्या असल्याचा खुलासा देखील आर्यनने केला होता.

आर्यनच्या अटकेमुळे शाहरुख खान चिंतेत आला. रविवारी रात्रीच तो स्पेनहून भारतात आला. शाहरुख खान मुंबईत हजर होताच भाईजान सलमान खान त्याच्या भेटीसाठी त्याच्या घरी पोहचला होता. आर्यनला काल एक दिवसांची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. आज आर्यनला  किल्ला कोर्टात हजर करण्यात आले आहे. आता आर्यनच्या कोठडीत वाढ होणार की त्याला दिला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आर्यन खानला अटक होताच शाहरुख पठाण सिनेमाचे शुटींग अर्धवट सोडले

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -