घरमुंबईप्रदीप शर्मांमुळे नालासोपार्‍यात नवी राजकीय समीकरणे

प्रदीप शर्मांमुळे नालासोपार्‍यात नवी राजकीय समीकरणे

Subscribe

शुक्रवारी विरोधकांचा महापालिकेवर मोर्चा

चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पोलीस सेवेतील राजीनाम्यानंतर आपल्या नव्या कार्यसंकल्पाचा श्रीगणेशा गणरायांच्या चरणी वंदन करून मंगळवारी केला. त्याचवेळी नालासोपार्‍यात एका वेगळ्या जनसंघर्षाची नांदी शिवसेनेसह विरोधी पक्षांच्या जिल्हा अध्यक्षांनी एकत्र येऊन केली. जनेतच्या आजवरच्या नाराजीला मूर्तरूप देण्यासाठी धडक मोर्चाचा निर्धार एका पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांनी व्यक्त केला.

शर्मा नालासोपार्‍यातून लढणार अशी चर्चा असताना प्रथमच विरोधी पक्ष एकत्र एका मंचावर आल्यामुळे हा बहुजन विकास आघाडीच्या विरोधात नव्या राजकीय समीकरणांचा श्रीगणेशा तर नाही ना? असा प्रश्न विचारला जात आहे.
महापालिकेचा बेजबाबदार कारभार, बेफिकीर लोकप्रतिनिधी आणि त्यामुळे त्रस्त नागरिक या सगळ्याला वाचा फोडण्यासाठी शुक्रवार, 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता हा मोर्चा निघणार आहे. यावेळी महापालिकेचे प्रतिकात्मक श्राद्ध घालण्यात येणार आहे.

- Advertisement -

शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, भाजपा वसई विरार जिल्हाध्यक्ष सुभाष साटम, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, तालुकाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, गटनेत्या किरण चेंदवणकर, भाजपचे गटनेते किरण भोईर, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष ईश्वर धुळे आदी यावेळी उपस्थित होते. आगरी सेना, श्रमजीवी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष यांचाही आंदोलनात सहभाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -