घरनवी मुंबईAtal Setu: अटल सेतूवर बेस्ट पाठोपाठ आता NMMT ही धावणार

Atal Setu: अटल सेतूवर बेस्ट पाठोपाठ आता NMMT ही धावणार

Subscribe

नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लवकरच सार्वजनिक वाहतुकीतून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवास करता येणार आहे.

मुंबई: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लवकरच सार्वजनिक वाहतुकीतून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवास करता येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका अंडरटेकिंग यांनी सोमवारी ही घोषणा केली आहे. 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात लांब सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं लोकार्पण करण्यात आलं होतं. (Atal Setu After BEST NMMT will run on Atal Setu )

NMMT शासनाने नेरूळ ते मंत्रालय ही 115 क्रमांकाची वातानुकूलित बस एमटीएचएल मार्गे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या मार्गावरून ही बस सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नवी मुंबईकरांना देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलावरून प्रवास करता येणार आहे.

- Advertisement -

सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबई ते मुंबई असा प्रवास करता यावा, यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने नेरूळ ते मंत्रालय ही एनएमएमटी बस सेवा एम टी एच एल मार्गे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 115 क्रमांकाची एसी बस सोडण्यात येणार असून ही बस खारकोपर ते मंत्रालयापर्यंत चालवली जात असून रहिवाशांच्या मागणीनुसार, ही सेवा आता नेरूळ येथून सुरू होईल आणि एमटीएचएलमार्गे जाईल.

नेरुळ ते मंत्रालय या 52 किमीच्या प्रवासासाठी सध्याचे भाडे 90 ठेवण्यात आले आहे. सध्या या मार्गावरून सकाळी 2 आणि सायंकाळी 2 अशा चार वातानुकूलित इलेक्ट्रिक बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

सर्वसामान्यांसाठी निर्णय

चारचाकी वाहन नसल्यानं सर्वसामान्य नागरिकांना अटक सेतूवरून जाता येत नव्हतं. एनएमएमटी बस सेवेमुळे आता सर्वसामान्यांना आपल्या कुटुंबाला घेऊन भारतातील सर्वात लांब सागरी पुलावरून प्रवासाचा अनुभव घेता येणार असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे.

नेरुळ ते मंत्रालय बससेवा

एनएमएमटीची नेरूळ ते मंत्रालय ही बस सेवा नव्यानेच सुरू झालेल्या अटल सेतूवर लवकरच धावणार आहे. या बसच्या तिकीट दरात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ केलेली नाही. प्रत्येक एसी बसमध्ये सध्या लागू असलेले तिकीट दरच आकारण्यात येणार आहेत.

(हेही वाचा: JEE Main: जेईई मेनचा रिझल्ट जाहीर; महाराष्ट्रतील तीन विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -