घरमुंबईअग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी आढळल्यास कारवाई - आदित्य ठाकरे

अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी आढळल्यास कारवाई – आदित्य ठाकरे

Subscribe

अविघ्न पार्क या इमारतीला लागलेली आग विझवताना आग विझवणाऱ्या स्प्रिंकल मधून पाणी कमी प्रमाणात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याठिकाणी पाण्याचा दाब कमी का होता याची चौकशी केली जाईल, अशी माहिती पर्यटन, पर्यावरण मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

तसेच, उंच इमारती बनवताना त्यामध्ये अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सदर हायराईज इमारतीला लागलेली आग ही दुर्दैवी घटना आहे. आग का व कशी लागली, याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीनंतर संबधित दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दोषींवर कठोर कारवाई करणार – अस्लम शेख

अविघ्न पार्क इमारत दुर्घटनेची मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख गंभीर दखल घेतली असून घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोरात-कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यापुढे प्रत्येक हायराईज इमारतीला त्यांचा अग्नी सुरक्षा अहवाल दर सहा महिन्यांनी पालिकेला सादर करणे आणि तेथील सुरक्षा रक्षकांना देखील अग्नी सुरक्षाविषयक प्रशिक्षण घेणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

- Advertisement -

इमारतींमधील अग्नीसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याच्यादृष्टीने अग्नीशमन विभाग व संबधित अन्य विभागांसोबत लवकरच बैठक घेणार असल्याचे मंत्री शेख यांनी शेवटी सांगितले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -