घरताज्या घडामोडीMega Block update : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Mega Block update : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Subscribe

मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवारी २४ ऑक्टोबर २०२१ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक कार्यान्वित करेल. ठाणे- कल्याण अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणा-या डाउन धीमी/अर्धजलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील व ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

- Advertisement -

कल्याण येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिमी/अर्धजलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील व डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येऊन वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाउन धीम्या सेवा वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशीराने आगमन/सुटतील.

- Advertisement -

पनवेल- वाशी दरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.(बेलापूर- खारकोपर सेवा प्रभावित नाही; नेरुळ- खारकोपर सेवा रद्द राहतील) पनवेल येथून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या वेळेत बेलापूर/पनवेल करीता डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

नेरूळ येथून सकाळी १०.१५ ते दुपारी २.४५ या वेळेत खारकोपर करीता सुटणा-या डाउन मार्गावरील सेवा आणि खारकोपर येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ या वेळेत नेरूळ करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • ब्लॉक कालावधी दरम्यान बेलापूर आणि खारकोपर दरम्यान सेवा वेळापत्रकानुसार चालतील.
  • ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागात विशेष लोकल चालविण्यात येतील.
  • ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

हे देखरेख मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.


हे ही वाचा – रोहा-माणगाव स्थानकांवर एक्सप्रेसना लवकरच लाल झेंडा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -