घरमुंबईकर्करोगावरील औषधांसाठी ‘बार्क’चे महत्त्वपूर्ण पाऊल

कर्करोगावरील औषधांसाठी ‘बार्क’चे महत्त्वपूर्ण पाऊल

Subscribe

अणुआधारित औषधांच्या उत्पादनासाठी पहिली ‘पीपीपी’ संशोधन अणुभट्टी विकसित. नव्याने विकसित केलेल्या अणूभट्टीमुळे प्रभावी आणि परवडणा-या दरामध्ये अणूआधारित औषधे उपलब्ध होऊन कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर उपचार करणे अधिक सुलभ व कमी खर्चाचे होण्यास मदत होणार आहे.

जागतिक पातळीवरील अणूआधारित औषधांची मागणी लक्षात घेता भाभा अणू संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) वतीने औषधांच्या उत्पादनासाठी देशातील पहिली खासगी-सार्वजनिक तत्त्वावर आधारित अणूभट्टी विकसित केली आहे. सरकारच्या मेक इन इंडिया धोरणाच्या अनुषंगाने बनवण्यात आलेल्या या अणूभट्टीमुळे वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणार्‍या रेडिओआयसोटोपच्या बाबतीत स्वावलंबी बनण्याचे दृष्टीने भारताने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नव्याने विकसित केलेल्या अणूभट्टीमुळे प्रभावी आणि परवडणा-या दरामध्ये अणूआधारित औषधे उपलब्ध होऊन कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर उपचार करणे अधिक सुलभ व कमी खर्चाचे होण्यास मदत होणार आहे.

जागतिक स्तरावर अणूआधारित औषधांची बाजारपेठ जवळपास ६ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी आहे. ही बाजारपेठ वेगाने वाढत असून, २०३० पर्यंत ती ३० दशलक्ष इतकी होण्याची शक्यता आहे. बार्कच्या माध्यमातून भारतामध्ये महत्त्वाचे सर्व आयसोटोप बनवले जातात. युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अन्य आशियायी देशांमधील औषधांची मागणी पूर्ण करण्यासाठी काही आयसोटोप भारताला आयात करावे लागतात. पण बार्कने नव्याने विकसित केलेली अणूभट्टीमुळे आयसोटोप बनवण्यामध्ये भारताने एक उंची गाठली आहे. अणूआधारित औषधांच्या उत्पादनासाठी बीएआरसीने विकसित केलेली अणूभट्टी ही सार्वजनिक-खासगी तत्त्वावर उभारण्यात येणारी देशातील पहिली अणूभट्टी ठरली आहे. या प्रस्तावित भागीदारीमध्ये खाजगी संस्थांना अणुभट्टी आणि प्रक्रिया सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी संशोधन अणुभट्टीमध्ये तयार होणार्‍या आयसोटोपवर प्रक्रिया करणे आणि विक्रीचे विशेष अधिकार मिळणार आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमातंर्गत ही अणूभट्टी विकसित करण्यात आली आहे. सरकारच्या मेक इन इंडिया धोरणाच्या अनुषंगाने हा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणार्‍या प्रमुख आयसोटोपच्या बाबतीत भारत स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असणार आहे. यामुळे प्रभावी आणि परवडणार्‍या दरामध्ये उपचार करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर नियोजित संशोधन अणुभट्टीसाठी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये अणुआधारित औषधे हा वैद्यकीय क्षेत्राच्या बाजारपेठेत एक महत्वाचा जागतिक घटक बनणार आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात आधुनिक संशोधन अणुभट्टी भारतामध्ये उभारण्यात येणार असल्याचे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव के.एन. व्यास यांनी सांगितले.

- Advertisement -

अणुऊर्जा विभागाने भारतीय आणि जागतिक गुंतवणूदारांबरोबर या प्रकल्पासाठी चर्चा सुरू केली आहे. २०२१ पहिल्या तिमाहीमध्ये गुंतवणूकदारांसाठी ‘रोड शो’ करण्यात येणार आहे. प्रस्तावित अणुभट्टी उभारणीचे काम पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच खाजगी भागीदारांच्या निवडीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

‘बार्क’ने ६० वर्षांमध्ये अनेक प्रकारची नवीन रेडिओआयसोटोप विकसित केली आहेत. त्यामुळे देशाच्या आयातीमध्ये घट झाली. तसेच आयसोटोपबाबतचे अन्य देशांवरील अवलंबित्व कमी झाले. या प्रकल्पामुळे देशातल्या गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतल्या लोकांना वाजवी किंमतीमध्ये जीवरक्षकाचे काम करणारी आयसोटोप उपलब्ध होऊ शकणार आहेत.
– डॉ. ए.के. मोहंती, संचालक, बीएआरसी
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -