घरमुंबईखुशखबर! भाऊबीज निमित्ताने बेस्टच्या जादा गाड्या धावणार

खुशखबर! भाऊबीज निमित्ताने बेस्टच्या जादा गाड्या धावणार

Subscribe

प्रवाशांच्या सोयीसाठी १९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत बेस्टच्या २० जादा बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. आता मंगळवारी म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी भाऊबीज सणानिमित्ताने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

मुंबईतील प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवाळी निमित्ताने खरेदीकरिता मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. प्रामुख्याने मुंबईतील वीर कोलकाता उद्यान-प्लाझा, दादर, वांद्रे, महात्मा फुले मार्केट, काळबादेवी, ए.पी.एम.सी. मार्केट, वाशी इत्यादी ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. या प्रवाशांच्या सोयीसाठी १९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत बेस्टच्या २० जादा बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. आता मंगळवारी म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी भाऊबीज सणानिमित्ताने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. बसने एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा – ‘उतणार नाही मातणार नाही’; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेंची प्रार्थना

- Advertisement -

‘या’ मार्गांवर बेस्टच्या जादा गाड्या धावणार

भाऊबीज सणानिमित्ताने प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई शहर, पूर्वज-पश्चिम उपनगरे, मीरारोड, भाईंदर, ठाणे शहरातील मॅरेथॉन चौक, कोपरी, कॅडबरी जंक्शन, रेतीबंदर-कळवा या ठिकाणी तसेच नवी मुंबई परिसरातील कोपरखैराणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली गांव, सीबीडी-बेलापूर इत्यादी ठिकाणी प्रवर्तित होणाऱ्या विविध बसमार्गावर एकूण १६४ अतिरिक्त बसगाड्या प्रवर्तित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांच्या मदतीकरिता गर्दीच्या बसथांब्यावर तसेच रेल्वे स्थानकांबाहेरील बसस्थानकांवर बसनिरीक्षक/ वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती देखील बेस्टकडून देण्यात आली आहे. या सर्व सुविधांच्या पार्श्वभूमीवर बसप्रवाशांनी बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -