घरमहाराष्ट्र'उतणार नाही मातणार नाही'; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेंची प्रार्थना

‘उतणार नाही मातणार नाही’; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेंची प्रार्थना

Subscribe

विजयानंतर धनंजय मुंडे यांनी आपले काका म्हणजे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी म्हणजे गोपीनाथ गडावर जाऊन ते नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी 'उतणार नाही मातणार नाही, जनसेवा आणि जन संघर्षाचा तुमचा वारसा सोडणार नाही', अशी प्रार्थना केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी लागला. या निवडणुकीत बरेच निकाल धक्कादायक लागले. त्यातील एक निकाल म्हणजे बीडच्या परळी मतदारसंघातला. या मतदारसंघातून भाजपच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे निवडणूक लढवत होत्या. त्यांच्या विरोधात त्यांचेच चुलत भाऊ धनंजय मुंडे निवडणूक लढवत होते. निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुंडे भाऊ-बहिणींमध्ये कलगीतुरा रंगला. मात्र, अखेर राष्ट्रवादीचे उमेदवार गोपीनाथ मुंडे विजयी झाले. या विजयानंतर धनंजय मुंडे यांनी आपले काका म्हणजे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी म्हणजे गोपीनाथ गडावर जाऊन ते नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी ‘उतणार नाही मातणार नाही, जनसेवा आणि जन संघर्षाचा तुमचा वारसा सोडणार नाही’, अशी प्रार्थना केली.


हेही वाचा – इतिहासाची पुनरावृत्ती होणार? शिवसेनेकडे ‘ही’ खाती येण्याची शक्यता

- Advertisement -

 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यावरही घेतला होता आशीर्वाद

परळी विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी कै. गोपीनाथराव मुंडे यांच्या गोपीनाथगड या समाधीस्थळी जाऊन नमन केले. तसेच वडील कै. पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊनही त्यांनी नमन केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीही त्यांनी समाधीस्थळी जात आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर विजयानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी या दोन्ही ठिकाणी जाऊन नमन केले. ‘उतणार नाही मातणार नाही, स्व.मुंडे साहेब आणि स्व.अण्णांकडून आपल्याला मिळालेला जनसेवा करण्याचा आणि जन संघर्षाचा वारसा सोडणार नाही’, असे मुंडेंनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती सुर्यभान मुंडे, संचालक माणिकभाऊ फड, शिवाजीराव सिरसाट, विश्वंभर फड, पं.स.उपसभापती पिंटू मुंडे, बालाजी गित्ते, वाल्मिक गोल्हेर, अतुल मुंडे,  सोमनाथ फड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -