घरमुंबईबेस्ट संपावर, मुंबईकर तव्यावर!

बेस्ट संपावर, मुंबईकर तव्यावर!

Subscribe

बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रोज सकाळी उठून कोणताही मुंबईकर सर्वात आधी कोणतीह गोष्ट करत असेल, तर ती म्हणजे लोकल आणि बेस्टचं वेळापत्रक चेक करणं. कारण त्याला कामावर जाण्यासाठी याच दोन माध्यमांचा सर्वात जास्त उपयोग होतो. मात्र, मंगळवारी सकाळी झोपेतून जागा झालेला मुंबईकर याच चिंतेत उठला की आज कामावर कसं जायचं. आणि त्याला कारण म्हणजे बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप! सोमवारी मध्यरात्रीपासूनच बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संप बेमुदत संप पुकारला. त्यामुळे भल्या सकाळी उठलेल्या २५ लाख मुंबईकरांची मोठी पंचाईत झाली.

मुंबईकरांना दुहेरी मनस्ताप

बेस्टची सेवाच बंद असल्यामुळे मुंबईकरांना घरापासून स्टेशनपर्यंत किंवा थेट कामाच्या ठिकाणापर्यंत खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. आणि अशा परिस्थितीमध्ये रिक्षा, टॅक्सीसारख्या खासगी वाहनांची मनमानी आणि केली जाणारी अवाच्या सव्वा भाडेआकारणी तर ओघाने आलीच. त्यामुळे मुंबईकरांना दुहेरी मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बेस्ट कामगार मिल कामगारांच्या वाटेवर

एकही बेस्ट डेपोबाहेर नाही

बेस्टचं आज सकाळी ७ वाजेचं हजेरीपत्रक पाहिलं, तर बेस्ट कर्मचाऱ्यांनी पाळलेल्या कडकडीत बंदाची खात्री पटते. आख्ख्या मुंबईत असलेल्या बेस्टच्या २७ डेपोंमध्ये फक्त १ कंडक्टर (२२५९ पैकी), ९ ड्रायव्हर (२२०० पैकी), ५१ इन्स्पेक्टर (१८० पैकी) आणि फक्त १९ स्टार्टर (१८९ पैकी) सकाळी कामावर रुजू झाले आहेत. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांनी देखील कामावर रुजू होऊन कोणतंही काम केलेलं नसल्यामुळे १८१२ पैकी एकही बेस्ट बस डेपोच्या बाहेर निघू शकलेली नाही. सुमारे ३० हजार बेस्ट कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत.

Best Morning Attendance Sheet
बेस्ट कर्मचाऱ्यांची सकाळी ७चं हजेरी पत्रक

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

१) बेस्ट उपक्रमाचा क अर्थसंकल्प मनपाच्या अ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरीत अंमलबजावणी करावी

- Advertisement -

२) २००७ पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची ७ हजार ३९० रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्ष्यी प्रभावाने वेतन श्रेणी निश्चित केली जावी

३) एप्रिल २०१६ पासून लागू करायच्या नवीन वेतन करारावर तातडीने वाटाघाटी सुरू कराव्यात

४) बेस्टमधील ४ हजार ९०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी द्यावी

५) दिवाळीपूर्वी जाहीर केलेले ५ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान तातडीने द्यावे

६) कर्मचारी सेवा निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढावा

७) अनुकंपा भरती सुरू करावी

शिवसेनेचा नक्की पाठिंबा की विरोध?

दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिलेल्या संपाच्या हाकेनंतर पालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेना आणि बेस्ट प्रशासनाला जाग आली आणि सोमवारी मध्यरात्री बेस्ट कर्मचाऱ्यांसोबत वाटाघाटींसाठी बैठका घेण्यात आल्या. मात्र, प्रशासनाकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलेल्या पर्यायांमुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचं समाधान न झाल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर ठाम राहाण्याचा निर्णय घेतला. एकीकडे सत्ताधारी शिवसेना संप मिटवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेकडून मात्र संपाला पाठिंबा देण्यात आला आहे.


हेही वाचा – बेस्ट आता ‘काट्यावर’ धावणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -