घरदेश-विदेशआजचा दिवस 'संपाचा'... वाहतूक कर्मचारीही संपावर

आजचा दिवस ‘संपाचा’… वाहतूक कर्मचारीही संपावर

Subscribe

वाहतूक आणि बेस्ट कर्मचाऱ्यांसोबतच बँक, वीमा क्षेत्रातील कर्मचारी तसंच बंदरावर काम करणारे आणि खासगी कंपन्यांचे कर्मचारीही संपावर जाणार आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चारही बाजूने कोंडी होणार आहे.

देशभरातील वाहतूक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून दोन दिवसांचा (८ आणि ९ जानेवारी) संप पुकारला आहे. वाहतूक कर्मचाऱ्यांच्या या देशव्यापी संपामुळे सामान्य नागरिकांचे मात्र चांगलेच हाल होणार आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करणाऱ्या हजारो-लाखो लोकांना आज आणि उद्या या संपामुळे त्रास सहन करावा लागणार आहे. वाहतूक कर्मचाऱ्यांना दरमहा २४ हजार रुपयांचे किमान वेतन दिले जावे आणि कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावी या प्रमुख मागण्यांकरता वाहतूक कर्मचाऱ्यांचा हा दोन दिवसीय संप असणार आहे. तर दुसरीकडे, सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्या सर्वच मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. तसंच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे मुंबई लोकलच्या गर्दीवर अतिरीक्त ताण पडणार आहे.

बँक, विमा कर्मचारीही संपावर…

वाहतूक आणि बेस्ट कर्मचाऱ्यांसोबतच बँक, वीमा क्षेत्रातील कर्मचारी तसंच बंदरावर काम करणारे आणि खासगी कंपन्यांचे कर्मचारीही संपावर जाणार आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चारही बाजूने कोंडी होणार आहे. चालक शक्ती युनियन तसंच आयटक, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि इंटक आणि सीटू या वाहतूक संघटनांचाही संपात सहभाग असणार आहे. संसदेत पास झालेल्या मोटार वाहन सुधारणा विधेयकाला या कामगारांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान, वाहतुक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याचे संरक्षण तसंच सामाजिक सुरक्षा नसल्यामुळे संपाची हाक देण्यात आली आहे.

- Advertisement -

ओला – उबरचाही सहभाग

देशभरात पुकारण्यात आलेल्या या संपाध्ये  खासगी बस, रिक्षा, टॅक्सी चालक तसंच ओला-उबरचे चालकही संपात सहभागी होणार आहेत. परिणामत: नागरिकांची मोठी कोंडी होणार आहे. तसंच ग्रामीण भागातील अडचणी अद्याप कायम दूर न झाल्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी डाव्या संघटनांकडून ग्रामीण हडताल करण्यात येणार आहे. या संपांतर्गत रस्ता रोको, रेल रोको करण्यात येणार असल्याचं समजत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -