घरमुंबईभिवंडीत प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

भिवंडीत प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

Subscribe

गोडाऊनच्या शेजारीच रिलायन्सचा पेट्रोलपंप आहे. गोडाऊनमध्ये केमिकलचा साठा असल्यामुळे आगीने आणखी रौद्ररुप धारण केले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

भिवंडीमध्ये प्लास्टिकच्या गोडाऊनला आग लागली आहे. राहनाल गावाच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. गोडाऊनमध्ये केमिकलचा साठा असल्यामुळे आगीने आणखी रौद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत. गोडाऊनच्या शेजारीच रिलायन्सचा पेट्रोलपंप आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -