घरमुंबईमालाड येथे बाईकची धडक लागून इसमाचा मृत्यू

मालाड येथे बाईकची धडक लागून इसमाचा मृत्यू

Subscribe

मालाड येथे बाईकची धडक लागून झालेल्या अपघातात एका 55 वर्षांच्या इसमाचा मृत्यू झाला. शिवानंद शिवरुद्रप्पा सोडे असे या मृत इसमाचे नाव असून अपघातानंतर पळून गेलेल्या अल्पवयीन बाईकस्वाराला मालवणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फंटागरे यांनी सांगितले. हा अपघात बुधवारी सकाळी पावणेनऊ वाजता मालाड, मालवणीतील गेट क्रमांक आठ, म्हाडा मैदानजवळील आगर अ‍ॅकेडमीसमोर झाला.

शिवानंद सोंडे हे मालवणी परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. गुरुवारी सकाळी ते आगर अ‍ॅकेडमीसमोरुन जात होते. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका बाईकस्वाराने त्यांना धडक दिली होती. अपघातात शिवानंद हे जखमी झाल्याने त्यांना तातडीने स्थानिक रहिवाशांनी कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

मात्र तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मृत शिवानंद यांचा मुलगा बंडप्पा सोडे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या बाईकस्वाराविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच अल्पवयीन असलेल्या बाईकस्वाराला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -