घरमहाराष्ट्रभाजपच्या पत्रकार परिषदेला हेल्मेट घालून पत्रकार

भाजपच्या पत्रकार परिषदेला हेल्मेट घालून पत्रकार

Subscribe

भाजप नेत्यांनी गेल्या आठवड्यात एका पत्रकाराला मारहाण केली होती. याचा निषेध करताना पत्रकारांनी अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. छत्तीसगडमधील पत्रकार भाजपाच्या कार्यक्रमात हेल्मेट घालून गेले. त्यांनी भाजपा नेत्यांना हेल्मेट घालून प्रश्न विचारले. हेल्मेट घालूनच त्यांनी नेत्यांच्या प्रतिक्रियाही घेतल्या आहेत. हातात माईक आणि डोक्यावर हेल्मेट असा वेष पत्रकारांचा होता.

शनिवारी पत्रकार सुमन पांडे यांना भाजपा नेत्यांनी मारहाण केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी भाजपाने बैठक बोलावली होती. त्यामध्ये भाजपा नेत्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचं चित्रीकरण करत असताना भाजपा नेत्यांनी मारहाण केली, असं पांडे म्हणाले.
या घटनेनंतर भाजपाच्या कार्यक्रमात पत्रकार हेल्मेट घालून गेले. याबाबत बोलताना काही पत्रकारांनी सांगितलं की, भाजपा नेत्यांना योग्य तो संदेश देण्यासाठी हेल्मेट घालून भाजपाच्या कार्यक्रमांचं वार्तांकन केलं आहे. तर काहींचं म्हणणं होतं की, भाजपा नेत्यांनी पुन्हा हल्ला केल्यास हेल्मेट कामी येईल.

- Advertisement -

दरम्यान, सुमन पांडे यांना झालेल्या मारहाणीबद्दल बोलताना पांडे म्हणाले की, भाजपा नेत्यांच्या आढावा बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी मी गेलो होतो. तिथे रायपूर भाजपाच्या अध्यक्षांसह अन्य काही नेते उपस्थित होते. तेव्हा तिथे अचानक काही नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ती चित्रीत करत असताना उत्कर्ष त्रिवेदी आणि राजीव अग्रवाल यांनी मला मारहाण केली. त्यांनी माझा फोन काढून घेतला आणि चित्रफित डिलीट केली. यानंतर 20 मिनिटं मला एका खोलीत ठेवण्यात आलं,’ असं पांडे म्हणाले.

दरम्यान, या घटनेनंतर पत्रकारांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर भाजपाच्या चार पदाधिकार्‍यांना अटक करण्यात आली. यानंतर या प्रकरणी भाजपा प्रवक्ते सच्चिदानंद उपासने यांनी सुमन पांडे यांची माफी मागितली. राजीव अग्रवाल, विजय व्यास, उत्कर्ष त्रिवेदी आणि डिना डोगरे अशी अटक करण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांची नावे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -