घरमुंबईपुनम महाजन मातोश्रीवर मनधरणीसाठी दाखल

पुनम महाजन मातोश्रीवर मनधरणीसाठी दाखल

Subscribe

युवासैनिकांची नाराजी दूर करण्यासाठी पुनम महाजन आज उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेना भाजपची युती झाली असली तरी त्यांच्यात अंतर्गत वाद सुरुच आहे. किरीट सोमय्यांनंतर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पुनम महाजन आज उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्या. आदित्य ठाकरे यांचा बॅनरवर नाव आणि फोटो नसल्यामुळे युवासेना नाराज झाली होती. जोपर्यंत पुनम महाजन चूक मान्य करत नाही तोपर्यंत प्रचारावर बहिष्काराचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यामुळे युवासैनिकांची नाराजी दूर करण्यासाठी पुनम महाजन आज उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या.

दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुनम महाजन यांची उध्दव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्याच्यासोबत भाजप आमदार पराग अळवणी होते. या भेटी दरम्यान जी चर्चा झाली ही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. युवासेनेने प्रचारावर घातलेला बहिष्कार मागे घेतला जाईल असे बोलले जात आहे.

- Advertisement -

 

हेही वाचा – ईशान्य पाठोपाठ उत्तर मध्य मुंबईत शिवसैनिकांमध्ये मानापमान

- Advertisement -

ईशान्य मुंबईच्या मुद्द्यावरून शिवसैनिक आक्रमक झालेले असतानाच आता उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार पूनम महाजन यांच्या बॅनरवरुन युवासैनिक नाराज झाले आहेत. पुनम महाजन यांच्या बॅनरवर युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे नाव आणि फोटो न छापल्याने युवासैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे युवा सेनेने याचा तीव्र निषेध केला असून जोवर उमेदवार ही चूक मान्य करणार नाही तोवर भाजपच्या प्रचारावर बहिष्कार घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -