घरदेश-विदेशभाजप नावे बदलण्याच्या धुंदीत भारतरत्न मिळालेल्या महापुरुषांचा अवमान करतेय - नवाब मलिक

भाजप नावे बदलण्याच्या धुंदीत भारतरत्न मिळालेल्या महापुरुषांचा अवमान करतेय – नवाब मलिक

Subscribe

जगातले सर्वात मोठे स्टेडियम मोटेरा अहमदाबाद येथे होते आहे याचा आम्हाला आनंद आहे परंतु भारतरत्न असलेल्या महापुरुषांची नावे बदलण्याची परंपरा भाजप सरकारने सुरू केलीय याचे दु:ख वाटते, असे नवाब मलिक म्हणाले.

नावे बदलण्याच्या धुंदीत भारतरत्न मिळालेल्या महापुरुषांचा अवमान भाजपकडून करण्यात येतोय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. अहमदाबादमध्ये भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नाव बदलून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे यावर नवाब मलिक यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला आहे. जगातले सर्वात मोठे स्टेडियम मोटेरा अहमदाबाद येथे होते आहे याचा आम्हाला आनंद आहे परंतु भारतरत्न असलेल्या महापुरुषांची नावे बदलण्याची परंपरा भाजप सरकारने सुरू केलीय याचे दु:ख वाटते, असे नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे त्या स्टेडियमचे नाव भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नावाने ओळखले जात होते. आता ते नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. हरियाणामध्येही स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे देण्यात आले आहे. नावे बदलण्याच्या धुंदीत भाजपसरकार सर्व हदे पार करत आहे. आतापर्यंत शहरांची नावे बदलली जात होती आता तर भारतरत्नांची नावे असलेली हॉस्पिटल आणि स्टेडियम बदलली जात आहेत ही दु:खाची बाब असून देशाची जनता कदापि खपवून घेणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.


हेही वाचा – जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडिअमला नरेंद्र मोदींचे नाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -