घरमुंबईसंघाच्या कार्यशाळेसाठी अमित शाह मुंबईत

संघाच्या कार्यशाळेसाठी अमित शाह मुंबईत

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आज भाईंदरच्या उत्तन येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा अचानक आज पहाटे मुंबईत आले आहेत. आज भाईंदरच्या उत्तन येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्या कार्यशाळेच्या निमित्ताने अमित शहा आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अमित शहा आज दिवसभर या कार्यशाळेसाठी उत्तन येथे थांबणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांच्या सोबत त्यांची बैठक होणार आहे. ही बैठक २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा | रामासाठी मोहन भागवतांचे गणपतीला साकडं

- Advertisement -

राम मंदिरावर चर्चा होणार का?

गुरुवारी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांनी महाडमध्ये घेतलेल्या सभेत भाजपवर टीकास्त्र सोडले. त्यांनी राम मंदिराच्या विषयावरही सरकारवर ताशेरे ओढले. संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनीही दसरा मेळाव्यात राम मंदिराविषयी भाष्य केले होते. त्याअगोदर त्यांनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीला राम मंदिर बांधावे असे साकडे घातले होते, त्यामुळे या बैठकीत राम मंदिरावर चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा | पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच – उद्धव ठाकरे

- Advertisement -

याअगोदरही संघाच्या कार्यक्रमासाठी आले होते शाह

याअगोदरही अमित शहा २८ जुलैला संघाच्या विविध संघटनांच्या समन्वय बैठकीला मुंबईत आले होते. विशेष म्हणजे शहा त्यावेळी सहा दिवसांपूर्वीच भाजपच्या बैठकीस मुंबईत आले होते.


हेही वाचा – निवडणुका जवळ आल्या… चला, चला राममंदिर बांधू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -