घरमहाराष्ट्रपुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे

पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच – उद्धव ठाकरे

Subscribe

उद्धव ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका. सध्या ते रायगड दौऱ्यावर आहेत.

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे सध्या रायगड दौऱ्यावर आहेत. कोकणात २०१९ च्या निवडणूकीच्या मोर्चेबांधणीला शिवसेनेची सुरुवात झाली आहे. आज उद्धव ठाकरे यांनी रायगडच्या महाड येथे सभा घेतली. या सभेमध्ये उद्धव ठकरे यांनी भाजपवर टिकास्त्र सुरु केले आहे. गेल्या पाच वर्षात भाजपने काय केले? असा सवाल त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार येते आणि जाते, त्यानंतर पुन्हा पाच वर्षांनी नवे सरकार येते. सरकार बरोबर दुष्काळही येतो. हे सत्तेवर येतात आणि समस्येच्या मुळाचा विचार न करता वरवरच्या समस्येवर बोलतात. आता जाहीर झालेला दुष्काळही त्याचप्रकारचा असल्याचे उद्धव म्हणाले आहेत. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात काय केलं, याचा हिशोब उद्धव यांनी मागितला आहे.

‘दुष्काळाची कामं कधी सुरु करणार?’

उद्धव ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत वरुण राजाच्या कृपेमुळे दोनचार वर्षे चांगले गेले आहेत. परंतु, यावर्षी दुष्काळाची झळ आतापासून बसायला लागली आहे. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे. सरकारने काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. परंतु, नुसते जाहीर करून काय होणार आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. दुष्काळी काम कधी सुरु करणार? पाण्याचे टॅंकर कुठून आणणार? चारा कसा मिळणार? या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे.

- Advertisement -

हेही वाचा | धरणग्रस्तांच्या पाठीशी सदैव उभा रहाणार – उद्धव ठाकरे

‘मदांत झालेल्या हत्तीला अंकुश वठणीवर आणतो’

उद्धव ठाकरे म्हणतात की, आज मी राज्यभर फिरणार आहे, ते फक्त टीकेसाठी नाही. तर शिवसौनिकांच्या भेटीसाठी फिरणार आहे. लोकं म्हणतात तुम्ही देखील सत्तेत आहात. केंद्रात आणि राज्यात आमच्यासोबत भाजप सत्तेवर आहे. मदांत झालेल्या हत्तीला अंकुश वठणीवर आणतो, तसा जर या लोकशाहीवर एखादा हत्ती सत्तांध होत असेल तर त्यावर मी शिवसेनेचा किंवा शिवसैनिकांचा अंकुश ठेवणार असल्याचे उद्धव म्हणाले.

- Advertisement -

‘जे दिसतंय ते पटत नाही’

‘जे दिसतंय ते पटत नाही, आणि पटत नाही ते बोलणं ते माझ्या रक्तात नाही’, असे उद्धव म्हणाले. आपल्याला सेना प्रमुखांचे स्वप्न पूर्ण करायचं असल्याचं ते म्हणाले आहेत. सध्या देशात विचित्र वातावरण असून जनतेला आधार हवा असल्याचे ते म्हणाले. ठाकरे यांनी शिवसैंनिकांना संदेश दिला आहे. लोकांशी संबंध प्रस्थापित करा, असा संदेश त्यांनी दिला. त्याचबरोबर निवडणुकीत आपला एकही शिवसैनिक फुटणार नाही, असेही ते ठामपणाने म्हणाले.

हेही वाचा | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी कस्टडीतून आरोपी फरार

अयोध्येत जाऊन मोदींना प्रश्न विचारणार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर आणि इतर पक्षांवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, मला खोट बोलून मतं नको. मोदी सरकारचे अच्छे दिन नुसत्या थापा होत्या. लोकांनी मत दिल्यानंतर देशातील समस्या सोडवल्या नाहीत. त्याचबरोबर मोदी सरकारने राम मंदिर हा जुमलाच असल्याचे सांगून टाकावा. मंदिर वहीं बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे, त्यामुळे आता राम मंदिरावर आपण अयोध्येत जाऊन मोदींना जाब विचारणार असे उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा | यासाठी सरकारच्या विरोधात बोलतो – उद्धव ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -