घरमहाराष्ट्रपिंपरीत मध्यरात्री धुमश्चक्री; सहा बाईक जाळल्या

पिंपरीत मध्यरात्री धुमश्चक्री; सहा बाईक जाळल्या

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्या जळाल्याचे सत्र सुरुच आहे. पिंपरी-चिंचवडच्या मिलिंदनगरमध्ये मध्यरात्री ६ बाईक जळाल्याची घटना घडली आहे. अज्ञातांनी बाईक जाळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा गाड्या जळाल्याची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडच्या मिलिंदनगरमध्ये मध्यरात्री ही घटना घडली आहे. पार्किंमध्ये उभ्या असलेल्या सहा बाईक जळाल्या आहे. या आगीमध्ये सहाही बाईक जळून खाक झाल्या आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या आगीमध्ये काही घरांचे नुकसान झाले आहे मात्र कोणतिही जीवितहानी झालेली नाही. अज्ञात टोळक्यांनी गाड्या जाळल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आग लावली की लावण्यात आली याचा पिंपरी पोलिसांकडून शोध सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -