घरमुंबईBMC Budget 2024 : महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी 508 कोटींची तरतूद

BMC Budget 2024 : महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी 508 कोटींची तरतूद

Subscribe

 या 508 कोटींच्या निधीमध्ये, दिव्यांग व्यक्तींना अर्थसहाय्य देण्यासाठी 112 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, महिलांच्या अर्थसहाय्य योजनेसाठी 107 कोटी रुपये, बचत गटांना अर्थसहाय्य देण्यासाठी 160 कोटी रुपये, पात्र दिव्यांग महिलांच्या रोजगारासाठी 10 कोटी रुपये, ज्येष्ठ नागरिकांना अर्थसहाय्य देण्यासाठी 11 कोटी रुपये, बेघरांच्या निवाऱ्यासाठी 25 कोटी रुपये, नोकरदार महिलांच्या वसतीगृहांसाठी 19 कोटी रुपये, पळणाघरासाठी 7 कोटी रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात महिला, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी 508 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई महापालिकेने मुंबई शहराचा सर्वांगीण विकास साधताना महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांचा बारकाईने विचार केल्याचे दिसून येत आहे. (BMC Budget 2024 Provision of 508 crores for the welfare of women disabled senior citizens)

या 508 कोटींच्या निधीमध्ये, दिव्यांग व्यक्तींना अर्थसहाय्य देण्यासाठी 112 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, महिलांच्या अर्थसहाय्य योजनेसाठी 107 कोटी रुपये, बचत गटांना अर्थसहाय्य देण्यासाठी 160 कोटी रुपये, पात्र दिव्यांग महिलांच्या रोजगारासाठी 10 कोटी रुपये, ज्येष्ठ नागरिकांना अर्थसहाय्य देण्यासाठी 11 कोटी रुपये, बेघरांच्या निवाऱ्यासाठी 25 कोटी रुपये, नोकरदार महिलांच्या वसतीगृहांसाठी 19 कोटी रुपये, पळणाघरासाठी 7 कोटी रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना: 111.83 कोटींची तरतूद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असेल तरी ते रात्रंदिवस ठाण्यातील शिवसेनेचे मोठे नेते व शिंदे यांचे मार्गदर्शक गुरू धर्मवीर आनंद दिघे यांची सावली होते. त्यांच्या छत्रछायेखालीच शिंदे हे शिवसेनेचे एक मोठे नेते म्हणून उदयास आले. आज त्यांच्या पूर्व पुण्याईने ते मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, यंदाच्या अर्थसंकल्पात दिव्यांग व्यक्तींसाठी अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे.

मुंबईतील 18 वर्षांवरील वैश्विक ओळखपत्र, पिवळे कार्ड धारक 42,078 दिव्यांग व्यक्तींना (40 टक्के ते 80 टक्के) दर सहा महिन्यांसाठी सहा हजार रुपये तर वैश्विक ओळखपत्र, पिवळे कार्ड धारक 17,037 दिव्यांग व्यक्तींना ( 80 टक्के पेक्षाही जास्त दिव्यांग) दर सहा महिन्यांसाठी अठरा हजार रुपये अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी 111.83 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

दिव्यांग व्यक्तींना बेस्ट बसमधून मोफत प्रवास देण्यासाठी सहा कोटी रुपये, दिव्यांग व्यक्तींना आणखीन सुखकर प्रवास उपलब्ध करण्यासाठी स्कूटर सुविधा बहाल करण्यात येणार असून त्यासाठी 7.50 कोटी रुपयाची तरतूद, पात्र दिव्यांग महिलांसाठी स्वयंरोजगार देण्यासाठी 10.22 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा : World Cancer Day :कॅन्सरशी जिद्दीने लढणाऱ्या पत्नीसाठी आयुष्यमान खुरानाची खास पोस्ट, पत्नीचे कौतुक करताना म्हणाला…

ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र

ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन सुसह्य होण्यासाठी महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष धोरण आखले आहे. या धोरणाच्या अंतर्गत मुंबईतील सात परिमंडळात ज्येष्ठ नागरिकांसाठी सात विरंगुळा केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, ल्युडो, टिव्ही, इनडोअर गेम्स, म्युझिक सिस्टिम, वृत्तपत्रे व वाचनीय पुस्तके इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : Maharashtra Congress : काँग्रेसचे 15 आमदार महायुतीत जाणार? मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता

महिलांसाठी विशेष सुविधा

महिलांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांना इतर सेवासुविधा पुरविण्यासाठी महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच 1600 स्व्यंसहाय्यता महिला बचतगटांसाठी प्रत्येकी एक लाख रुपये अर्थसहाय्य देण्यासाठी 160 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त अर्थसहाय्य देण्यासाठी आणखीन 107.29 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी 6.44 कोटी रुपये, पाळणाघरासाठी सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नोकरदार महिलांसाठी वसतीगृह व्यवस्था करण्यासाठी 19 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, तृतीयपंथीयांसाठी अर्थसहाय्य योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बेघरांसाठी निवारे व्यवस्था देण्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -