घरमुंबईरस्त्यावर उतरुन कामांची पाहणी करा, नव्या आयुक्तांचे निर्देश

रस्त्यावर उतरुन कामांची पाहणी करा, नव्या आयुक्तांचे निर्देश

Subscribe

पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सहायक आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांन रस्त्यावर उतरून पाहाणी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई महापालिकेचे उपायुक्त आणि सहायक आयुक्त वातानुकूलित बंदिस्त कार्यालयात बसून सर्व निर्णय घेत असून ते रस्त्यावर उतरत नसल्याचा आरोप होत असतानाच महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सर्वच अधिकार्‍यांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले आहेत. उपायुक्त तसेच विभागाच्या सहायक आयुक्तांना आठवड्यातून दोनदा रस्त्यावर उतरून विविध कामांची पाहणी तसेच तपासणी करणे आयुक्तांनी बंधनकारक केले आहे. त्यामुळे याबाबतचा आदेश आयुक्तांनी जारी करत ही पाहणी करताना स्थानिक लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळी ७ ते १० दरम्यान तपासणी

मुंबईत विविध नागरी सेवा सुविधा पुरवणाऱ्या महानगरपालिकेचे कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, तसेच त्या तक्रारींचा जलद निपटारा व्हावा आणि प्रशासकीय कार्यवाहींमध्ये सुव्यवस्थापन साध्य व्हावे, यासाठी महापालिकेचे परिमंडळीय उपायुक्त आणि विभागीय सहाय्यक आयुक्त यांनी आपल्या कार्यक्षेत्रात आठवड्यातून दोन वेळा ’स्थळ भेटी’ द्याव्यात असे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत. या अनुषंगाने महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळांच्या उपायुक्तांनी दर आठवड्यात मंगळवारी आणि गुरुवारी; तर सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी ७ ते १० या कालावधी दरम्यान स्थळ भेटी देऊन महापालिकेच्या विविध कामांची पाहणी आणि तपासणी करावयाची आहे. तसेच स्थळ भेटींदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्याशी संवाद साधून आणि त्यांच्या तक्रारी आणि सूचना विचारात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचाशिवसेनाप्रमुखांचे नाव राष्ट्रीय पुरुष, नेत्यांच्या यादीत!

अहवाल अतिरिक्त आयुक्तांना सादर होणार

यादरम्यान जे कामगार, पर्यवेक्षक, अभियंता कामचुकार करत असल्याचे आढळून येतील त्यांच्यावर त्वरीत शिस्तभंगाची कारवाई करावी. परिमंडळीय उपायुक्त आणि विभागीय सहाय्यक आयुक्त यांनी स्थळ भेटींबाबतचा अहवाल त्याच दिवशी संबंधित अतिरिक्त आयुक्तांकडे दुपारी २ वाजेपर्यंत सादर करावयाचा आहे, असेही महापालिका आयुक्तांनी निर्देशित केले आहे. यामध्ये कचरा निर्मूलन, रस्ते आणि पदपथ, महापालिकेच्या मालमत्ता याबरोबरच काही महत्वाचे निर्देश दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -