घरमुंबईशारदाश्रम तांत्रिक विद्यालयाचा 'रौप्य महोत्सव'

शारदाश्रम तांत्रिक विद्यालयाचा ‘रौप्य महोत्सव’

Subscribe

दादर येथील शारदाश्रम तांत्रिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांकडून गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आजी माजी शिक्षकांचा गौरव करण्यात आला आहे.

आजच्या जगात एकट्याने काहीच होत नाही. एखाद्या गोष्टी पूर्णत्वास नेण्यासाठी त्यामागे उभी असणारे समूह त्यांचे नेटवर्किंग हे महत्वाचे आहे. त्यामुळे एखाद्या शैक्षणिक संस्थेसाठी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांची ताकद ही प्रचंड महत्वाची असल्याचे प्रतिपादन विस्कूलचे समूह संचालक डॉ. उदय सांळुखे यांनी नुकतेच मुंबईत काढले. हे प्रतिपादन करताना सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेसाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

रौप्य महोत्सवी वर्षास प्रारंभ

दादर येथील शारदाश्रम तांत्रिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त नुकतेच शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांकडून गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आजी माजी शिक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी आयोजित खास कार्यक्रमात शारदाश्रमचे माजी विद्यार्थी आणि विस्कूलचे समूह संचालक डॉ. उदय सांळुखे यांनी वरील प्रतिपादन केले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी शारदाश्रम विद्यामंदिरचे मुख्याध्यापक मंगेश कोचरेकर सर यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी, आजी – माजी शिक्षक आणि मोठ्या संख्येने माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.

- Advertisement -

माजी विद्यार्थ्यांची ताकद महत्वाची

या कार्यक्रमात सांळुखे यांनी त्यांच्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. शारदाश्रम मधील ते दिवस कधीच विसरता येणार नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी कुर्ला ते दादर प्रवासाबद्दल अनेक किस्से यावेळी सांगून उपस्थितांची मने जिंकली. तर शाळेचे ऋण कधीच फेडू शकत नाही, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. रौप्य महोत्सवी कार्यक्रमाबद्दल सांगताना शाळेचे मुख्याध्यापक मंगेश कोचरेकर म्हणाले की, संस्थेने स्थापनेपासून जो आपला डौलरा सन्मानाने उभा केला होता. तो आजही तसाच कायम असल्याचे गौरवद्वार त्यांनी याप्रसंगी काढले. तर शाळेने जो मनोरा रचला आहे, त्यात अनेकांचा हात असून आज त्यांना विसरुन चालणार नाही. शाळेच्या या प्रवासात संस्थेने जी मोलाची साथ दिल्याचे सांगताना त्यांनी शाळेच्या जडणघडणीत मुख्याध्यापकांमागे उभे राहणारे सैन्य म्हणजे शिक्षक वर्ग असतो, असे आजी माजी शिक्षकांचे सैन्य माझ्या पाठी मागे सैदव उभे राहिल्याने इथपर्यंत पोहचू शकलो, असे त्यांनी सांगितले. आज शाळेचे अनेक दिग्गज विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, ते विद्यार्थी जेव्हा शाळेबद्दल गौरवाद्वार काढतात ते गौरवाद्वगारचा शाळेचा खरा सन्मान असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

आजी माजी शिक्षकांचा सन्मान

शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थी कार्यकरी समितीकडून आजी माजी शिक्षकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अत्यंत आगळा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने सर्वच आजी माजी शिक्षकांची मने जिंकली. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु हे नेहमीच महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी शारदाश्रम तांत्रिक विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून गुरुंसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

- Advertisement -

हेही वाचा – शारदाश्रममध्ये कबड्डी दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -