घरमुंबईआयुक्तांच्या देणगीच्या आवाहनाला महापालिका कंत्राटदारांचा आखडता हात

आयुक्तांच्या देणगीच्या आवाहनाला महापालिका कंत्राटदारांचा आखडता हात

Subscribe

विविध विकास कामांची कंत्राट कामे मिळवणाऱ्या छोट्या व मोठ्या कंत्राटदारांसह काही कायमस्वरुपी कंत्राटदारांनी अद्यापही मदतीचा हात पुढे केलेला नाही.

कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी वैयक्तिक तसेच ट्विटरच्या माध्यमातून विविध मोठ्या कंपन्या आणि संस्था आदींना आवाहन करत व्हेंटिलेटर, पीपीई, सॅनिटायज़र्स, ग्लोव्हज़, मास्क, इत्यादी देणगी स्वरूपात देण्याच्या सूचना केल्या होत्या. आयुक्तांच्या या आवाहनाला आता चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. अनेक खासगी कंपन्या आणि संस्था सढळ हस्ते पुढे आलेल्या असतानाच महापालिकेतील कंत्राटदारांनी मात्र आखडता हात घेतला आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या देणगीदारांमध्ये एकाही महापालिकेच्या कंत्राटदाराने मदतीचा हात पुढे केलेला दिसून आलेला नाही. महापालिकेची आजवर शेकडो कोटी रुपयांची कंत्राटे मिळवणारे कंत्राटदार राजस्थानात मंदिर उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये देणगी स्वरुपात देत असताना देशावरील या आपत्तीच्या प्रसंगी अशाप्रकारे पाठ फिरवत असल्यामुळे या कंत्राटदारांच्या ‘नियती’वरच प्रश्न उपस्थित झाला आहे .


हेही वाचा – महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद, कार्पोरेट कंपन्या आणि संस्थांकडून मदतीचा ओघ

कोरोना कोविड १९ बाधित रुग्णांना अव्याहतपणे व सातत्यपूर्ण सेवा देत असलेल्या या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर संसर्ग झालेल्या रुग्णांची देखील परिपूर्ण काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. ‘कोरोना’ संसर्गाची व्यापकता लक्षात घेता व भविष्यातील आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्याच्या तयारीचा व सुसज्जतेचा भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेने व्हेंटिलेटर, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’ अर्थात पी. पी. ई., सॅनीटायझर, ग्लोव्हज, मास्क इत्यादी वस्तूंच्या स्वरूपात देणगी देण्याचे आवाहन महापालिकेने यापूर्वीच केले आहे. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक कॉर्पोरेट कंपन्या, दानशूर संस्था वा व्यक्ती यांनी यापूर्वीच स्वतःहून पुढे येऊन वैद्यकीय साधने व यंत्रे देणगी स्वरुपात दिली आहेत. परंतु भविष्यातील आव्हानांच्या संभाव्य व्यापक तेच्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेने दानशूर संस्था व नागरिकांना वस्तू स्वरुपात देणगी देण्यासाठी आपल्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. देणगी म्हणून देणे अपेक्षित असलेल्या वस्तूंमध्ये प्रामुख्याने व्हॅंटिलेटर, पी. पी. ई., सॅनिटायझर, ग्लोव्हज़, मास्क इत्यादी वैद्यकीय साधनांचा समावेश असल्याचे महापालिकेने जाहीर केले.

- Advertisement -

या वस्तू दिल्या देणगी स्वरूपात

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या आवाहनानुसार, युवासेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी १ लाख हातमोजे, आरपीजी फाऊंडेशनने १०५० निट्राईल ग्लोज व १ लाख हातमोजे, रोमेल ग्रुप व अजमेरा ग्रुपने १५४० पीपीई किट, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड ने ८८ हजार ८०० मास्क व १० हजार हातमोजे, अमित चंद्रा फाऊंडेशन १०५ पीपीई किट, पारले अग्रो १६२० फुड्स व ड्रिंक्स, टाटा ऑटो कॉम्प ३९ व्हेंटीलेटर्स आदींचा वस्तू देणगी स्वरुपात दिल्या आहेत.

महापालिका कंत्राटदारांचा हात आखडता

मात्र, एका बाजुला आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध कार्पोरेट कंपन्या व संस्था देणगी देण्यासाठी पुढे येत असतानाच महापालिकेच्या विविध विकास कामांची कंत्राट कामे मिळवणाऱ्या छोट्या व मोठ्या कंत्राटदारांसह काही कायमस्वरुपी कंत्राटदारांनी अद्यापही मदतीचा हात पुढे केलेला नाही. मुंबई महापालिकेची एक कोटी ते हजार ते बाराशे कोटी रुपयांची कामे घेणाऱ्या मोठ्या कंत्राटदारांची संख्या मोठी आहे. तसेच ३ ते ५० लाखांपर्यंत कामे मिळवत कोट्यवधी रुपयांची कामेही मिळवणारे छोटे कंत्राटदारही मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे प्रत्येक छोट्या व मोठ्या कंत्राटदारांनी मदतीचा एक हात पुढे केल्यास महापालिकेच्या सर्व गरजा पूर्ण होवू शकतात. परंतु महापालिकेची कंत्राटे मिळवून केवळ आपली झोळी भरायची एवढेच काम महापालिकेच्या कंत्राटदारांचे आहे. त्यामुळेच त्यांना मुंबईतील आपत्तीचे काहीही नसून यापैंकी बऱ्याच कंपन्यांनी राजस्थान सरकारला देणगीसाठी पुढाकार घेतल्याचेही समजते. त्यामुळे मुंबईतून कमवायचे आणि राजस्थान किंवा आपल्या गावाला मदत करायची ही एकच भावना कंत्राटदारांची असल्याचे दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -