घरमुंबईपालिकेचा कोरोनावर आतापर्यंत १,३२९ कोटींचा खर्च, आणखीन ४०० कोटींची तरतूद

पालिकेचा कोरोनावर आतापर्यंत १,३२९ कोटींचा खर्च, आणखीन ४०० कोटींची तरतूद

Subscribe

मुंबई महापालिकेने ७ डिसेंबरपर्यंत १ हजार ३२९ कोटी ४१ लाख रुपये खर्चले आहेत. तसेच, कोरोनाचा वाढता मुक्काम लक्षात घेता मार्च २०२१ पर्यंत पालिकेने आणखीन ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ७ डिसेंबरपर्यंत १ हजार ३२९ कोटी ४१ लाख रुपये खर्चले आहेत. तसेच, कोरोनाचा वाढता मुक्काम लक्षात घेता मार्च २०२१ पर्यंत पालिकेने आणखीन ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचाच अर्थ असा की, मार्च २०२१ पर्यंत तरी कोरोना मुंबईमधून हद्दपार होणार नाही.

मुंबईत फेब्रुवारीपासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागला होता. त्यामुळे मुंबईत मार्च अखेरपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. परिणामी दुकाने, हॉटेल, नाट्यगृहे, सिनेमागृहे, खासगी कंपन्या, उद्योगधंदे बंद झाले. मुंबई महापालिकेने विकासकामे बाजूला सारत फक्त कोरोनाला रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सभा, समितीच्या बैठका आदी सर्वकाही ठप्प झाले. मात्र कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेला उपाययोजनांच्या नियोजनावर पदोपदी लाखो, कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार होता. ही बाब जाणून पालिका आयुक्तांनी खर्चाबाबतच्या मर्यादा लक्षात घेता स्थायी समितीकडून कोरोनाबाबतच्या उपाययोजनांसाठी, औषधे, यंत्र सामग्री आदींच्या खरेदीसाठी अधिकार मिळावे म्हणून मंजुरी घेतली.

- Advertisement -

पालिकेच्या अर्थसंकल्पात आकस्मिक निधीची केलेली तरतूद खूपच अपुरी होती. १ एप्रिल २०२० पर्यंत पालिकेकडे आकस्मिक निधीत ८५२.५७ कोटी रुपयांची शिल्लक होती. त्यात शासनाकडून पालिकेला कोरोनासाठी ६० कोटींचा निधी उपलब्ध झाला. पालिकेने आणखीन ३०० कोटींची भर घालून एकूण ३६० कोटी रुपयांचा निधी आकस्मिक निधीत वळता केला. आकस्मिक निधी म्हणून जमा १२१२.५७ कोटीं रुपये निधीतून १३ ऑक्टोबर २०२० पर्यंत महसुली व भांडवली खर्च भागविण्यासाठी ११८२.२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे आकस्मिक निधीत केवळ ३०.३२ कोटी रुपयांचा निधी शिल्लक राहिला होता.

पालिकेने कोरोनासाठी निधीची कमतरता भासू नये यासाठी अर्थसंकल्पातील शिल्लक १६४४.४२ कोटी रुपयांमधून ४५० कोटी रुपये आकस्मिक निधीत वळविण्यात आले. तक्तपूर्वी, अर्थसंकल्प ‘अ’मधून ३०० कोटी रुपये आकस्मिक निधीत वळविण्यात आले होते मात्र तो निधी त्यावेळी खर्च झाला. त्यामुळे आता पुन्हा अर्थसंकल्प ‘अ’ अंतर्गत आणखीन ४०० कोटी रुपयांची गरज भासली असून त्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजूरीसाठी आला आहे. त्यावर समिती काय निर्णय घेते हे आगामी बैठकीत पाहावे लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बॉलिवूडमधील कार डिझायनर दिलीप छाब्रियाला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -