घरमुंबईBMC : मुंबई पालिका आयुक्त चहल यांची होणार बदली; गगराणी आणि म्हैसकर...

BMC : मुंबई पालिका आयुक्त चहल यांची होणार बदली; गगराणी आणि म्हैसकर यांची नावे चर्चेत

Subscribe

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या झटक्यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे तसेच अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यानंतर हे बदलीसत्र सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातही पालिका आयुक्तपदासाठी भूषण गगराणी आणि मिलिंद म्हैसकर या दोन अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत.

हेही वाचा – Narendra Modi : सारा खेळ खुर्चीचा; सभा मोदींची आणि खुर्च्यांवर फोटो राहुल गांधींचे, काय आहे प्रकार?

- Advertisement -

लोकसभा निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने लोकसभा निवडणुकीपूर्वी सनदी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र मुंबईसह राज्यात आणि देशात सुरू झाले आहे. तथापि, तीन वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिका आयुक्तपदी असलेले इक्बाल सिंह चहल यांच्या बदलीसाठी तीन वर्षांचा निकष लागू करू नये, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. पण निवडणूक आयोगाने मंगळवारी ही मागणी फेटाळली. त्यामुळे इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आता अटळ आहेत.

विशेष म्हणजे, तत्कालीन काँग्रेस आघाडीचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि राज्य निवडणूक आयुक्त नंदलाल यांच्यातही बदल्यांचाही वाद झाला होता. निवडणुकीच्या तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्या विलासराव देशमुख यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या न केल्याने तत्कालीन निवडणूक आयुक्त नंदलाल यांनी याबाबत पत्रव्यवहार केला होता. परंतु तरीही बदल्या न करण्यात आल्याने नंदलाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांची नावे असलेले पत्र विलासराव देशमुख यांना पाठविले होते, हे उल्लेखनीय.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. येथे आयोजित महिला बचत गटाच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात दोन लाखांहून अधिक महिला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मोदी यांचा हा दौरा झाल्यानंतर रात्री उशिरा किंवा उद्या, गुरुवारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत नवीन आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त कोण येणार? कोणत्या नेत्यांच्या, पार्टीच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लागणार? या पदासाठी कोण कोण इच्छुक आहेत? याबाबतच्या चर्चेला पालिकेत उधाण आले आहे.

हेही वाचा – Thackeray group : ‘तातू’ पिलावळीचा बोलविता धनी शोधायला हवा, ठाकरे गटाचा राणेंवर निशाणा

असे असले तरी, महापालिका आयुक्त चहल यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) भूषण गगराणी तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (सार्वजनिक आरोग्य) मिलिंद म्हैसकर या दोन नावांची चर्चा आहे. तर, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची देखील बदली होणार असून त्यासाठी डझनभर सनदी अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावल्याचे सांगण्यात येते. तर, अपर मुख्य सचिव (वित्त) पदी ओ. पी. गुप्ता आणि अपर मुख्य सचिव (महसूल) पदी राजेश कुमार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे चहल यांची अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने, 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारला नव्याने दिले आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना महापालिकेत येऊन 3 वर्षे 8 महिने इतका कालावधी पूर्ण झालेला आहे. तसेच, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना जानेवारी महिन्यात 4 वर्षे तर अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनाही 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आयुक्त चहल आणि दोन अतिरिक्त आयुक्त यांच्या बदली करणे राज्य शासनाला अपरिहार्य आहे.

हेही वाचा – Ambadas Danve : ‘एक फूल दोन हाफ’ म्हणत अंबादास दानवेंनी एसआयटीसाठी दिली यादी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -