घरमहाराष्ट्रAmbadas Danve : 'एक फूल दोन हाफ' म्हणत अंबादास दानवेंनी एसआयटीसाठी दिली...

Ambadas Danve : ‘एक फूल दोन हाफ’ म्हणत अंबादास दानवेंनी एसआयटीसाठी दिली यादी…

Subscribe

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा ‘एक फूल दोन हाफ’ असा उल्लेख करत, एसआयटी चौकशीसाठी विविध घटनांची यादीच अंबादास दानवे यांनी दिली आहे.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : “होऊ दे खर्च”; मोदींसाठी 12 कोटींचा चुराडा; वडेट्टीवारांचे टीकास्त्र

- Advertisement -

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत अपशब्दांचा वापर केला. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली असता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या मागणीला मान्यता दिली.

- Advertisement -

यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा आंदोलन भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये शिरेना म्हणून चौकशी सुरू केली आहे. एसआयटी नेमण्यासाठी अजून काही विषय आहेत. प्रक्षोभक भाषणावर कारवाई होऊ शकते, मग गोळ्या झाडणाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी, असे सांगत त्यांनी विविध प्रकरणे दिली आहेत.

हेही वाचा – Sanjay Raut : “अमित शाहांचे वक्तव्य हास्यास्पद”, परिवारवादाच्या मुद्द्यावरून राऊतांचा टोला

  • भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांची एसआयटी चौकशी कधी होणार?
  • रिंकी बक्सला प्रकरणात खासदार राहुल शेवाळे यांची एसआयटी चौकशी कधी होणार?
  • पुण्यात 4 हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडतात त्याची एसआयटी चौकशी कधी होणार?
  • अंडरवर्ल्डशी संबंध असणाऱ्या बुकीची मुलगी गृहमंत्र्याच्या घरात जाते, त्यांच्या पत्नीशी मैत्री करते याची एसआयटी चौकशी कधी होणार?
  • जाहीर सभेतून भास्कर जाधव यांना आईवरून शिव्या देणाऱ्या निलेश राणे यांची तसेच भास्कर जाधव यांना चोप देणार म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची एसआयटी चौकशी कधी होणार?
  • तलाठी भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी कधी होणार?
  • अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले, याची एसआयटी चौकशी कधी होणार?
  • एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी असलेला मुलगा, एका मुलीला गाडीखाली चिरडून मारून टाकण्याचा प्रयत्न करतो, त्याची एसआयटी चौकशी कधी होणार?
  • वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्याची एसआयटी चौकशी कधी होणार?

हेही वाचा – PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर; 45 एकरात उभारला सभामंडप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -