घरताज्या घडामोडीBMC : मुंबईसह नाशिक मनपामध्ये कारकीर्द गाजविणारे रमेश पवार सेवानिवृत्त

BMC : मुंबईसह नाशिक मनपामध्ये कारकीर्द गाजविणारे रमेश पवार सेवानिवृत्त

Subscribe

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेत कनिष्ठ अभियंता ते सह आयुक्त आणि नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून काही काळ असे एकूण 37 वर्षे प्रशासकीय सेवा प्रामाणिकपणे बजावणारे रमेश पवार हे नुकतेच सेवानिवृत्त झाले.

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेत कनिष्ठ अभियंता ते सह आयुक्त आणि नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून काही काळ असे एकूण 37 वर्षे प्रशासकीय सेवा प्रामाणिकपणे बजावणारे रमेश पवार हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. मुंबई महापालिका मुख्यालयातील महापालिका आयुक्त यांच्या सभागृहात आयोजित समारंभात महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्यासह विविध सह आयुक्त, उपायुक्त, संचालक, सहायक आयुक्त आणि खाते प्रमुख उपस्थित होते. (BMC Ramesh Pawar who served in Mumbai and Nashik Municipal Corporation retired)

रमेश पवार यांच्यासोबत प्रशासकीय कामकाज करणारे अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांना आलेले अनुभव, रमेश पवार यांनी शिस्तबद्ध आणि सचोटीने केलेले कामकाज, त्यांच्यामध्ये, प्रशासकीयदृष्ट्या आव्हान ठरणारे प्रसंग हाताळण्याची खुबी, आणि एक व्यक्ती म्हणून देखील त्यांच्याकडून सर्वसामान्यांसह प्रत्येकाला मिळणारी चांगली वागणूक, मदत यावर भाष्य केले. तसेच, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : उन्मेष पाटील शिवबंधन बांधणार? संजय राऊत म्हणतात…

रमेश पवार यांची कारकीर्द

सन 1987 मध्ये महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाल्यानंतर अभियांत्रिकी सेवा, सहायक आयुक्त आणि उपायुक्त/ सह आयुक्त या तिन्ही प्रशासकीय संवर्गात प्रत्येकी सुमारे बारा वर्षे याप्रमाणे रमेश पवार यांचा प्रशासकीय प्रवास राहिला. तसेच, ते साहाय्यक आयुक्त या पदावर कार्यरत असताना रस्ता रुंदीकरण, नाला रुंदीकरण आदींसाठी अतिक्रमण निर्मूलन करून प्रकल्प मार्गी लावणे, महापालिकेचे विकास नियोजनासाठी आरक्षित भूखंड इतरांच्या ताब्यातून परत मिळवणे ही त्यांची कामे लक्षवेधी ठरली. उप आयुक्त, सह आयुक्त या नात्याने कर्तव्य बजावताना त्यांनी दूरदृष्टीने विविध प्रशासकीय धोरणे आखली, ज्यामध्ये प्रॉक्युरमेंट पॉलिसी, लिज पॉलिसी यांचा समावेश आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिका आयुक्तांचे उपायुक्त म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. महाराष्ट्र शासनाने देखील मार्च २०२२ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत नाशिक महापालिका आयुक्त या पदावर प्रतिनियुक्ती केली. तेथे गोदावरी नदी प्रदूषण मुक्त आणि अतिक्रमण मुक्त करण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम तयार करून रमेश पवार यांनी शुभारंभ केला. मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून देखील काही काळ त्यांनी अतिरिक्त कार्यभार यशस्वीपणे सांभाळला.

गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये योग्य प्रशासकीय पद्धतीने निराकरण करण्यात हातखंडा असलेले रमेश पवार यांना स्वच्छ अभियान पुरस्कार, महापौर चषक, संत गाडगे महाराज स्वच्छता पुरस्कार, महापालिका आयुक्तांची प्रशस्तिपत्रं यासह इतर विविध सामाजिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.


हेही वाचा – Lok Sabha Election : आमचा दरवाजा ठोठावलात तर…; हेमंत गोडसेंच्या नाराजीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -