घरठाणेLok Sabha 2024 : ठाणे लोकसभेबाबत भाजपाचे माजी खासदार संजीव नाईक यांचे...

Lok Sabha 2024 : ठाणे लोकसभेबाबत भाजपाचे माजी खासदार संजीव नाईक यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून संजीव नाईक हे ठाणे लोकसभा धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांना तशी ऑफर देण्यात आल्याचीही माहिती समोर आली होती. परंतु, याबाबत आता स्वतः संजीव नाईक यांनीच माहिती दिली आहे.

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, अद्यापही महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. याबाबत आता नवी मुंबईतील भाजपाचे नेते आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी सूचक वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून संजीव नाईक हे ठाणे लोकसभा धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांना तशी ऑफर देण्यात आल्याचीही माहिती समोर आली होती. परंतु, याबाबत आता स्वतः संजीव नाईक यांनीच माहिती दिली आहे. (Lok Sabha Election 2024 : Sanjeev Naik statement about Thane Constituency)

हेही वाचा… Mahayuti Controversy: लोकसभेच्या जागांसाठी शिंदेंची भाजपशी झुंज; उमेदवार निश्चितीत भाजपचा हस्तक्षेप

- Advertisement -

भाजपा नेते, माजी खासदार संजीव नाईक यांनी आज मंगळवारी (ता. 02 एप्रिल) ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यावेळी भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नाईक यांनी ठाणे लोकसभेच्या जागेबाबत मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेकडून कोणीही कोणतीही ऑफर दिलेली नाही. अनेकजण विचारत आहेत की, अजून उमेदवार जाहीर का झाला नाही. पण, जो खेळाडू रोज समुद्रात पोहतो, त्याला तरण तलावात जायची गरज नसते, त्यामुळे उमेदवार लवकरच जाहीर होणार आहे, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

तसेच, महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल आणि मोदींनी दिलेल्या अब की बार 400 पार या घोषणेनुसार निवडून येणाऱ्या खासदारांमध्ये त्या उमेदवाराचा समावेश असेल, असेही नाईक यांनी सांगितले. उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहिती नाही. पण तो महायुतीचा उमेदवार असणार आहे. याबाबत वरीष्ठ नेतेमंडळी निर्णय घेणार आहेत. भाजपाची सर्व तयार झालेली आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी याची रचना वेगळ्या पद्धतीची आहे. तिघांची रचना एकत्र करून महारचना तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच उमेदवार लवकरच निश्चित होईल. पण हा गड वेगळ्या पद्धतीने लढवला जाईल. गत निवडणुकीपेक्षा जास्तीत जास्त मतदान व्हावे असे शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष या तिघांनी मिळून ठरवलेले आहे, असेही संजीव नाईक यांनी सांगितले.

- Advertisement -

भाजपाचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक किंवा त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव नाईक यांच्यासाठी भाजपाने या जागेवर दावा केला असून शिवसेनेकडूनही या जागेवर दावा करण्यात येत आहे. यातून या जागेच्या तिढ्याबाबत वेगवेगळ्या चर्चा पुढे येत आहेत. ही जागा मुख्यमंत्र्यांना सोडावी लागली तरी दोघांच्या सहमतीचा उमेदवार म्हणून संजीव नाईक यांनी धनुष्यबाण चिन्हावर ही निवडणूक लढवावी असा प्रस्तावही भाजपाने मुख्यमंत्र्यांपुढे ठेवल्याची चर्चा आहे. परंतु, असा कोणताही प्रस्ताव पक्षाने मांडलेला नसून किंवा त्यांनाही कोणताच प्रस्ताव आला नसल्याचे संजीव नाईक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा…  Lok Sabha 2024 : उन्मेष पाटील ठाकरे गटात करणार प्रवेश? भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ म्हणतात…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -