घरमहाराष्ट्रLok Sabha Election : आमचा दरवाजा ठोठावलात तर...; हेमंत गोडसेंच्या नाराजीवर संजय...

Lok Sabha Election : आमचा दरवाजा ठोठावलात तर…; हेमंत गोडसेंच्या नाराजीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असले तरी महायुतीत नाशिकच्या जागेवर रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकची जागा आपल्याला मिळावी यासाठी शिवसेना (शिंदे गट), भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी तिन्ही पक्षांची इच्छा आहे. मात्र मतदान अवघ्या काही दिवसांवर आलेलं असतानाही उमेदवारी जाहीर न झाल्याने नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे महायुती आणि एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याचपार्श्वभूमीवर शिंदे गटात नाराज असलेल्या हेमंत गोडसेंसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दरवाजे उघडे आहेत का? असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी भाष्य केलं आहे. (Lok Sabha Election Hemant Godse Sanjay Raut Nashik Lok Sabha Constituency Shiv Sena BJP NCP Ajit Pawar Group)

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : उन्मेष पाटील शिवबंधन बांधणार? संजय राऊत म्हणतात…

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, खासदार गोडसे हे सध्या शिंदे गटात असले तरी आम्ही त्यांना निवडून आणलं होतं. परंतु, आता कोणत्याही गद्दारासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे नाहीत. आमचा दरवाजा ठोठावलात, अंगणात बसलात आणि छाती बडवली तरीदेखील गद्दारांसाठी आमचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडले तर आमच्या निष्ठावंतांचा अपमान होईल. अनेक निष्ठावान, प्रामाणिक, स्वाभिमानी जनता आणि स्वाभिमानी शिवसैनिक मिळून आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र आलो आहोत. त्यामुळे गद्दारांसाठी आता दरवाजे उघडले तर या सर्व निष्ठावंतांचा अपमान होईल, अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

शिंदेंचाही पत्ता कट होऊ शकतो

शिंदे गटावर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, शिंदेंच्या अनेक खासदारांचे पत्ते कट होणार आहेत. शिंदेंचाही पत्ता कट होऊ शकतो. कारण शिंदेंचे अनेक खासदार एकनाथ शिंदेंना डावलून परस्पर देवेंद्र फडणवीस यांना भेटत आहेत. लोक योग्यतेनुसार भेटायला जात आहेत. लोक आधी पाहतात की पॉवर सेंटर कुठे आहे, महत्त्वाचे निर्णय कोण घेऊ शकतं, त्यानुसार लोक त्या-त्या व्यक्तीकडे जातात. लोक कळसुत्री बाहुल्यांकडे जात नाहीत, बोलक्या बाहुल्यांकडे जात नाहीत, लोक बाहुल्यांची सूत्र हालवणाऱ्यांकडे जातात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha Election 2024 : भाजपाने ईव्हीएम हटवण्याची हिंमत दाखवावी; संजय राऊतांचे आव्हान

उमेदवारी मिळण्यापूर्वीच गोडसेंकडून प्रचार

दरम्यान, नाशिक मतदारसंघात भाजपाची ताकद असकल्याने स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला जागा देण्यास विरोध दर्शविला आहे. तसेच नाशिकच्या जागेसाठी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हेही इच्छुक आहे. याशिवाय हेमंत गोडसे यांनी नाशिक जागा आपल्याला मिळावी यासाठी त्यांनी शिवसेना मंत्री, आमदार आणि खासदारांना सोबत घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडं घातलं. त्यामुळे नाशिक लोकसभेची जागा महायुतीत कोणाला मिळणार याचा तिढा सुटलेला अद्यापही सुटलेला नाही. असे असतानाच दुसरीकडे हेमंत गोडसे यांनी 30 मार्च रोजी हनुमान मंदिरात आरती करून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. हेमंत गोडसेंच्या या कृतीवर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसताना गोडसेंनी अनधिकृतपणे प्रचाराला सुरुवात केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -