घरताज्या घडामोडीकोविडविरोधात मुंबई महापालिकेकडून ३ हजार कोटींचा खर्च, राज्य सरकारकडून परताव्याची प्रतीक्षा

कोविडविरोधात मुंबई महापालिकेकडून ३ हजार कोटींचा खर्च, राज्य सरकारकडून परताव्याची प्रतीक्षा

Subscribe

मुंबई महापालिकेने कोविड सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत विविध उपाययोजनांसाठी ३ हजार ३०० कोटींपेक्षाही जास्त रक्कम खर्च केली आहे. त्यापैकी ३ हजार कोटी रुपये राज्य सरकारकडून पालिकेला देण्यात येणार होते. मात्र पालिकेने वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्यापपर्यंत राज्य सरकारकडून त्याची प्रतिपूर्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिकेला या ३ हजार कोटींच्या रकमेसाठी वाट बघण्याशिवाय दुसरा कोणताही पर्यायच उरलेला नाही. राज्य सरकार पालिकेला कोविडवर आतापर्यंत केलेला खर्च देणार की नाही, देणार तर कधीपर्यंत देणार आणि जर देणार नसेल तर पालिकेने आणखीन प्रतिक्षा करण्याची गरजच काय ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मुंबईत मार्च २०२० पासून ते आजपर्यंत कोविड सारख्या भयानक रोगाने थैमान घातले. पालिका आरोग्य यंत्रणेकडे कोविडला रोखण्यासाठी आवश्यक औषधे, उपाययोजना याबाबत पुरेशी माहिती नसतानाही कोविडची पहिली, दुसरी लाट यशस्वी उपाययोजनेनंतर परतावून लावण्यात आली. तर तिसरी लाटही रोखून धरण्यात पालिकेला चांगलेच यश आले. मुंबईत कोविडचा संसर्ग कमी होऊन रुग्णसंख्या कमी झाली. कोविड जवळजवळ नियंत्रणात आहे. मात्र पालिकेला या कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवळजवळ ३ हजार ३०० कोटींपेक्षाही जास्त खर्च आलेला आहे. त्यापैकी ३ हजार कोटीच्या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य शासन करणार होते. त्यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे पत्रे पाठवून पाठपुरावा केला. अनेकदा विनंती केली, मागणी केली. मात्र राज्य सरकारने जवळजवळ कानावर हात ठेवले असल्याने या खर्चाची प्रतिपूर्ती अद्यापपर्यँत करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

त्यामुळे पालिका प्रशासन हतबल ठरले आहे. मुंबई महापालिकेने कोविडवर २७६४ कोटी सप्टेंबर २०२१ पर्यंत खर्च केले होते. तर ५०० कोटी रुपये तिसऱ्या लाटेत खर्च केले आहेत. सदर २,७६४ कोटीपैकी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १,४१७ कोटी रुपये तर उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १,३४७ कोटी रुपये प्रतिपूर्ती करण्यासाठी दावा केला आहे.


हेही वाचा : 12th Board Exam : बारावीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल, ५ आणि ७ मार्चचे पेपर पुढे ढकलले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -