घरमुंबईBMC : स्वाईन फ्ल्यूसह पावसाळी आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ

BMC : स्वाईन फ्ल्यूसह पावसाळी आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ

Subscribe

मुंबई: मुंबईसारख्या शहरात दीड कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. विशेषतः झोपडपट्टीत, नाल्यांलागत ६० टक्के लोक राहतात. झोपडपट्टी परिसरात स्वच्छतेचा अभाव असतो. परिणामी पावसाळी आजारांचे प्रमाणही जास्त असते. मुंबईत गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात घातक स्वाईन फ्ल्यूसह गॅस्ट्रो,मलेरिया,डेंग्यू लेप्टो, कावीळ, चिकनगुनीया आदी पावसाळी आजाराने त्रस्त रुग्णांच्या संख्येत यंदाच्या जून महिन्यात मोठी वाढ दिसून आल्याने पालिका आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

हेही वाचाःआनंदाची बातमी : तलावांत चांगला पाऊस; 10 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

- Advertisement -

गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदा गॅस्ट्रो रुग्ण संख्येत – १,२०१ ने वाढ, त्यापाठोपाठ मलेरिया रुग्ण संख्येत – ३२८ ने वाढ, डेंग्यू रुग्ण संख्येत – ३१४ ने वाढ, कावीळ रुग्ण संख्येत – ७७ ने वाढ, लेप्टो रुग्ण संख्येत – ८५ ने वाढ , चिकनगुनीया रुग्ण संख्येत ७ मे वाढ झाली आहे. तर स्वाईन फ्ल्यू पिडीत रुग्ण संख्येत ७ ने वाढ झाल्याचे पालिका आरोग्य खात्याने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.गतवर्षी जूनमध्ये डेंग्यूने एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. मात्र 23 जून रोजी मुंबईत लेप्टोने एकाचा मृत्यू झाला आहे,

मात्र पावसाळी आजार व स्वाईन फ्ल्यू रुग्णांच्या संख्येतील मोठी वाढ ही पालिकेने सर्वेक्षणासाठी नेमलेल्या रिपोर्टिंग युनिटची २२ वरून तब्बल ८८० पर्यंत वाढविल्याने दिसून आल्याचे पालिकेच्या नवनियुक्त कार्यकारी आरोग्य खात्याने म्हटले आहे.

- Advertisement -

 

आजार     रुग्ण     रुग्ण वाढ

– — — ———————————————
मलेरिया  ३४८  ६७६  ३२८
लेप्टो       १२    ९७    ८५
डेंग्यू       ३९   ३५३   ३१४
गॅस्ट्रो      ५४३ १,७४४ १,२०१
कावीळ     ६४ १४१     ७७
चिकनगुनिया  १  ८         ७
एच१ एन      १ २   ९०          ८८

महापालिका राबविणार डेंग्यू, मलेरिया ‘रॅपिड’ शोध मोहीम

पावसाळ्यात अनेकदा डेंग्यू-मलेरिया यासारख्या आजारांचे निदान लवकर न झाल्याने हे आजार बळावतात आणि प्रसंगी प्राणघातकही ठरू शकतात. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया (हिवताप) या सारख्या आजारांशी मुकाबला करण्यासाठी व त्यांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणा खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा दवाखाने, डॉक्टर यांच्या सहकार्याने कोविड विरोधातील लढ्याच्या धर्तीवर सुधारित कार्यपद्धती वापरून डेंगी, मलेरिया ‘रॅपिड’ शोध मोहीम राबविणार आहे. या शोध मोहीमेमुळे रुग्ण संख्या वाढल्यास त्वरित व वेळेत उपचार देणे शक्य होणार आहे. सर्व खासगी प्रयोगशाळा व रुग्णालये यांनी त्यांच्याकडील सर्व डेंग्यू व मलेरिया रुग्णांची माहिती पालिकेला देणे बंधनकारक असेल, असे परिपत्रक कार्यकारी आरोग्य अधिकारी यांमार्फत काढण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनात महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य व संबंधित यंत्रणांची एक विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीदरम्यान डॉ. शिंदे यांनी कोविड विरोधातील लढ्याच्या धर्तीवर डेंग्यू मलेरिया विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची निर्देश दिले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -