घरठाणेराष्ट्रवादी ठाणे शहराध्यक्ष पदी सुहास देसाई तर कार्याध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची निवड

राष्ट्रवादी ठाणे शहराध्यक्ष पदी सुहास देसाई तर कार्याध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची निवड

Subscribe

राज्याच्या उपमुख्यमंत्री पदीची सूत्रे अजित पवार यांनी हाती घेताच राष्ट्रवादीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे तडकाफडकी परांजपे यांना पदावरून दूर करत ठाणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक सुहास देसाई तर कार्याध्यक्ष पदी परिवहनचे सदस्य प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

अजित पवार यांनी युती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आता ठाणे शहरात देखील त्यांच्या निकटचे समजले जाणारे काही माजी नगरसेवक सुद्धा नॉट रीचेबल झाले आहेत. त्यात आव्हाड यांच्या जवळचे मानले जाणारे राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी देखील रविवारी सायंकाळी अजित पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले, त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांची ठाणे शहर अध्यक्षपदावरून हाकालभट्टी केली आहे. त्यानुसार आता सुहास देसाई यांच्याकडे हा पदभार देण्यात आला असल्याचे आव्हाड यांनी जाहीर केले आहे. तसेच कार्याध्यक्षपदी परवीन समितीचे सदस्य प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -