घरCORONA UPDATECorona: धक्कादायक! केईएममध्ये संशयित कोरोना रुग्णांचे मृतदेह पडून

Corona: धक्कादायक! केईएममध्ये संशयित कोरोना रुग्णांचे मृतदेह पडून

Subscribe

केईएम रुग्णालयात कोरोना चाचणीचे नमुने घेतल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच ज्या रुग्णांचे मृत्यू झाले आहेत, अशा १० संशयित रुग्णांचे मृतदेह विल्हेवाटीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या विल्हेवाटीसंबंधीच्या पद्धतीत सुधारणा करून मुंबई महापालिकेने विद्युत दाहिन्यांची सुविधा सर्वच स्मशानभूमीत करण्याची मागणी भाजपने केली आहे.

मुंबईमध्ये विद्युतदाहिन्यांची सुविध उपलब्ध असलेल्या ८ ते १० स्मशानभूमी असतानाही केवळ भोईवाडा येथील एकाच स्मशानभूमीत अशाप्रकारच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे मृतदेहाच्या विल्हेवाटीस विलंब होत आहे. आजमितिस केईएम रुग्णालयात स्वॅबद्वारे घेतलेल्या चाचणी नमुन्यांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत पावलेल्या सुमारे १० कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह विल्हेवाटीविना पडून असल्याची बाब भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांच्या विल्हेवाटीसंबंधीच्या पद्धतीत सुधारणा करून मुंबई महापालिकेच्या विद्युतदाहिन्यांची सुविधा उपलब्ध असलेल्या सर्वच स्मशानभूमी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे निर्देश त्वरीत देण्याची मागणी त्यांनी शिंदे यांनी केली आहे.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येसह मृतांचाही आकडा वाढत आहे. मात्र, मुंबईत कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट केवळ भोईवाडा स्मशानभूमीमधील विद्युतदाहिनीत करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनामुळे मृत पावणाऱ्या रुग्णांमध्ये संशयित रुग्णांचा समावेश आहे. असे संशयित रुग्ण, त्यांच्या नाक व घशातून स्वॅबद्वारे घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल येण्यापूर्वीच मृत पावलेले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अशा सर्व मृतदेहांची त्वरीत विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –

CoronaVirus: कोरोनाबाधित रुग्णांच्या घरांमधून सरासरी १० ते १२ रुग्णांची भर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -